शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही: पंकजा मुंडे

माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. | Pankaja Munde

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही: पंकजा मुंडे


मुंबई: शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा करण्यात आता अर्थ उरलेला नाही, अशी प्रतिक्रिया माजी आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी व्यक्त केली. शिवसेना-भाजपची युती 2014मध्येही तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा युती तूटून राज्यात सरकार स्थापन होऊनही एक वर्ष उलटले आहे. त्यामुळे आता या सगळ्यावर चर्चा करण्यात काही अर्थ उरलेला नाही, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. (Pankja Munde on Shivsena BJP re-alliance)

पंकजा मुंडे मंगळवारी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त (balasaheb thackeray death anniversary) त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर असल्यामुळेच मी त्यांना अभिवादन करण्यासाठी आल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

मुंडे-ठाकरे कुटुंबाचे जुने संबंध
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये आदराच्या भावना आहेत. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते. इतर अनेक पक्षातही असे संबंध असतात” असं पंकजा मुंडे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्यानंतर म्हणाल्या.

आता आणखी ताकदीने निवडणूक लढू, जयसिंगराव गायकवाडांच्या एक्झिटवर पंकजांची प्रतिक्रिया
जयसिंगराव गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न झाला, तरीही ते भाजप सोडून गेले. पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

‘शिवशक्ती-भीमशक्ती-भाजपची एकजूट, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली’
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना,भाजप आणि रिंपाईची युती तुटल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. भविष्यात तिन्ही पक्षांनी एकत्र येत पुन्हा एकजूट करणं ही बाळासाहेब ठाकरेंना खरी आदरांजली ठरेल, अशी भावना आठवलेंनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या:

शिवशक्ती-भीमशक्ती-भाजपची एकजूट, हीच शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली : रामदास आठवले

मातब्बर नेत्याने पक्ष सोडला, बंडखोरही अडला; औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड

बाळासाहेबांनी सांगितलेल्या विचार आणि विधानांवरच शिवसेना चालत आहे, अनिल परबांचा फडणवीसांना टोला

(Pankja Munde on Shivsena BJP re-alliance)