कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; संजय राऊतांचा राणेंना टोला

शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे... तो आमका असं म्हणत नाही. (sanjay raut)

कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच; संजय राऊतांचा राणेंना टोला
संजय राऊत, शिवसेना खासदार
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 3:45 PM

नगर: शिवसैनिक कोणत्याही पक्षात गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. त्यात बदल होत नाही. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंना लगावला. (shivsena leader sanjay raut taunt union minister narayan rane)

नगरच्या येथे एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी हे विधान केलं. सत्ता असल्याने आम्ही अधिकाऱ्यांना दम देवू शकतो. गडचिरोलीला पाठवू का असा दम देवू शकतो. सत्ता हा मानसिक आधार असतो. मोदी म्हणतात कैसे हो भाई? याला सत्ता म्हणतात. गुजराती देखील सामना पेपर घेतता. शिवसेनेत माज असायलाच हवा. कोणी गुंड, मवाली म्हटलं तरी चालेल. वाघा सारखे जन्माला आलो, वाघासारखे मरणार, असं सांगतानाच शंकरराव गडाख सौम्य बोलतात. तुम्हीही हळूहळू डरकाळी फोडाल, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी नगर जिल्हा शिवसेनेचा नंबर एकचा जिल्हा झाला पाहिजे असं सांगितलं. शंकरराव गडाख निवडून आल्यापासून शिवसेनेसोबत आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

शिवसैनिक कधीच माजी होत नाही

संसदेत अनेक खासदार येतात. बऱ्याच खासदारांना कोणी ओळखतही नाहीत. पण शिवसेनेच्या खासदारांना ओळखले जाते. शिवसैनिक म्हणून ही ओळख आहे. पक्ष सोडून गेला तरी त्याची ओळख शिवसैनिक हीच राहते. हा नारायण राणे… तो आमका असं म्हणत नाही. तो शिवसैनिक आहे, असंच म्हटलं जातं. तुम्ही कुठंही जा लोकं तुम्हाला शिवसैनिक म्हणूनच ओळखणार, असा टोला राऊत यांनी राणेंना लगावला. आमदार आणि खासदार माजी होतो. पण शिवसैनिक कधीच माजी होत नाही, असंही ते म्हणाले. सत्ता हा मानसिक आधार आहे. सत्ता असो वा नसो शिवसेना स्टाईलने अधिकाऱ्यांकडून कामे करून घ्या, असं ते म्हणाले.

उद्धव ठाकरे वाईल्ड फोटोग्राफर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वाईल्ड फोटोग्राफर आहेत. ते वाघ आणि सिंहाचे फोटो काढतात. इतर प्राण्यांचे नाही, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

शिवसेनेचा ‌झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईल

यावेळी त्यांनी फडणवीसांवर नाव न घेता टीका केली. मी पुन्हा येईल …मी पुन्हा पुन्हा येईल… जोपर्यंत शिवसेनेचा ‌झेंडा तोपर्यंत पुन्हा पुन्हा येईल…, असा फडणवीसांना टोला लगावतानाच दिल्लीच्या‌ तक्तावरही भगवा फडकवू. हारलेल्या जागा पुन्हा जिंकायच्या आहेत. तिच खरी बाळासाहेबांना मानवंदना राहील, असं ते म्हणाले. (shivsena leader sanjay raut taunt union minister narayan rane)

संबंधित बातम्या:

चिपळूणला पुराचा फटका का बसला?, पाटबंधारे विभागाचा अहवाल सरकारकडे; दिलं ‘हे’ कारण!

तब्बल 11 वेळा निवडून येऊनही एसटीतून प्रवास करणारा अवलिया; वाचा, गणपतराव देशमुखांचे किस्से

क्रेडिट कार्ड नसेल तरीही हप्त्यांवर खरेदी करु शकता; जाणून घ्या सर्वकाही

(shivsena leader sanjay raut taunt union minister narayan rane)

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.