..तर मोदींनी भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी, मंदिर उघडण्याचं श्रेय घेणाऱ्यांना संजय राऊतांचा टोला

राज्यात उद्यापासून मंदिरं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केला.

..तर मोदींनी भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी, मंदिर उघडण्याचं श्रेय घेणाऱ्यांना संजय राऊतांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 15, 2020 | 11:38 AM

मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर उघडण्याचं श्रेय घेणाऱ्या भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी (Sanjay Raut On Temple Reopening). कारण, देशभरातील मंदिरं आणि प्रार्थनास्थळं ही त्यांच्याच आदेशानुसार बंद होती”, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे (Sanjay Raut On Temple Reopening).

राज्यात उद्यापासून मंदिरं उघडण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर घणाघात केला.

“महाराष्ट्रात उद्यापासून मंदिरं आणि सर्व प्रार्थनास्थळं उघडण्यात येत आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले. ते करतान त्यांनी काही सूचना केल्या. श्रींची ही इच्छा असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून देशात जे वातावरण होतं त्यामध्ये मंदिरंही बंद करावी लागली. पण देवाचे आशीर्वाद महाराष्ट्रावर होते, त्यामुळे आपण ते संकट परतवून लावू शकलो. पण, अजूनही ते पूर्ण संपलेलं नाही. त्यामुळे ज्या सूचना सरकारने केल्या त्याचे काटोकोरपणे पालन करा, असं आवाहन संजय राऊतांनी राज्यातील जनतेला केलं.

कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तरी मंदिरं उघडणं ही श्रेयवादाची लढाई नव्हती : संजय राऊत

“जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मंदिरात जाताना चपला बाहेर काढून जातो. चपला बाहेर काढा पण तोंडाला मास्क लावा. गर्दी आणि चेंगराचेंगरी करु नका. देवालाही आपली काळजी आहे. देवाने स्वत:ला बंदीस्त करुन घेतले होते. मात्र, आता मंदिरं उघडत आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्र हळूहळू मोकळा होत आहे. मुख्यमंत्री त्यांचे निर्णय टप्प्याटप्प्याने घेत आहेत, महाराष्ट्राला अनलॉक करत आहेत. कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, तरी मंदिरं उघडणं ही श्रेयवादाची लढाई नव्हती, ती देवाची इच्छा होती की, लोकांनी काही काळ घरी राहावं गर्दी करु नये. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रींच्या इच्छेनेच मंदिरं उघडलेली आहेत”, असंही ते म्हणाले.

आमच्यासाठी राम मंदिर उभारणे म्हणजे हिंदुत्वाचा विजय : संजय राऊत

“हा कोणाचा विजय किंवा पराभव नाही, देशभरात मोदींच्या आदेशानुसारच मंदिरं आणि प्रार्थनास्थळं बंद होती. जर हे ते (भाजप) विसरले असतील. तर, मोदींना त्यांची शाळा घ्यावी लागेल. मोदी आणि जेपी नड्डा, अमित शाह यांनी श्रेय घेणाऱ्यांची शाळा घेण्याची गरज आहे. आमच्यासाठी राम मंदिर उभारणे म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे, असं म्हणत राऊतांनी भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला (Sanjay Raut On Temple Reopening).

महाराष्ट्राच्या वाट्याला कोणी जाऊन नये, जो जातो त्याला महाराष्ट्र सोडत नाही : संजय राऊत

“महाराष्ट्र स्वाभिमानी राज्य आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला कोणी जाऊन नये, जो जातो त्याला महाराष्ट्र सोडत नाही”, असं म्हणत संजय राऊतांनी पुन्हा एकदा अर्णव प्रकरणावरुन टीका केली. ‘अमके तमके मी करीन’ हा अहंकार, अभिमानही फालतूच आहे. तुमचे कर्मच तुम्हाला वनवासात नाही, तर तळोजाच्या तुरुंगात घेऊन जाते! असा टोला शिवसेनेनं सामना या वृत्तपत्राच्या रोखठोक सदरातून लगावला होता.

“पूर्वी बाळासाहेब आणि आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करणे ऐवढच माझ काम आहे. सामना ही शिवसेनेची ताकद आहे”, असंही ते म्हणाले. आज संजय राऊतांचा 60 वा वाढदिवस आहे. त्यावेळी मी नेहमी शिवसेनेसाठी काम करत राहील असं ते म्हणाले.

Sanjay Raut On Temple Reopening

संबंधित बातम्या :

पहिल्या टप्प्यात दर्शन, तिसऱ्या टप्प्यात अभिषेक, पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर तीन टप्प्यात खुलं होणार

भाजपने सरकारचे डोळे उघडले; म्हणूनच मंदिराचे दार उघडले; नितेश राणेंचं टीकास्त्र

हिंदुत्त्वाचा विजय झाला, ‘श्रीं’नी सरकारचा अहंकार घालवला : तुषार भोसले

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.