AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेतला दुभंग अधिवेशनातही दिसतोय, नागपूर विधानभवनातलं चित्र पाहिलंत का? Video

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील आजच्या नागपूरातील हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेतला दुभंग अधिवेशनातही दिसतोय, नागपूर विधानभवनातलं चित्र पाहिलंत का? Video
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2022 | 9:14 AM
Share

नागपूरः विधानसभेचं हिवाळी अधिवेशन (Winter session) आजपासून सुरू होतंय. शिवसेना पक्षांतर्गत मोठी फूट पडल्यानंतरचं हे पहिलंच हिवाळी अधिवेशन आहे. त्यामुळे नागपूर (Nagpur) येथील विधानभवन परिसरातील शिवसेना कार्यालयात (Shivsena Office) नेमके कोण बसणार? शिंदे गटाचे आमदार, मंत्री बसणार की ठाकरे गटाचे नेते बसणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र विधानभवनातील कार्यालयाचीच विभागणी करण्यात आल्याने हे चित्र स्पष्ट झाले आहे.

टीव्ही 9 च्या प्रतिनिधींनी नागपूर विधानभवन परिसरातील पक्षांच्या कार्यालयांना भेट दिली, त्यावेळी ही विभागणी दिसून आली.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयावर गटनेता शिवसेना पक्ष असे नाव देण्यात आले आहे.
  •  विधानभवन परिसरात एकूण चार रुम शिवसेना पक्षाला होत्या. त्यापैकी पहिल्या दोन रुम उद्धव ठाकरे गटाला देण्यात आल्या आहेत. तर इतर दोन रुम शिंदे गटाला देण्यात आल्या आहेत.
  •  मुख्य प्रतोद म्हणून भारत गोगावले यांच्या नावाची पाटीदेखील लावण्यात आली आहे.
  • मात्र शिवसेना कार्यालयासमोरील पॅसेजमध्ये विभागणी झालेली नाही. या जागेत ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमदार आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

इथे पहा नागपुरातलं चित्र—

उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे अधिवेशनात

दरम्यान, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेदेखील आजच्या नागपूरातील हिवाळी अधिवेशनात उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक नागपुरात होत आहे. बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते अधिवेशनाला उपस्थिती लावतील.

शिवसेनेची सुनावणी कधी?

शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह यावर एकनाथ शिंदे यांनी दावा केल्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टातून निवडणूक आयोगाकडे गेला आहे. 12 डिसेंबर रोजी निवडणूक आयोगासमोर दोन्ही गटाच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली. तत्पुर्वी दोन्ही गटाने पक्षावर दावा सांगणारे पुरावे, प्रतिज्ञापत्र आयोगसमोर सादर केले आहेत. आता यापुढील निवडणूक आयोगाची सुनावणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.