उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच, नगरपालिका निवडणुकीपूर्वी साताऱ्याचं राजकारण तापलं

सातारा (Satara) नगरपालिकेची निवडणूक खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhonsle) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे.

उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरुच, नगरपालिका निवडणुकीपूर्वी साताऱ्याचं राजकारण तापलं
शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 8:12 PM

सातारा : सातारा नगरपालिकेची मुदत संपली असून सध्या प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. सातारा (Satara) नगरपालिकेची निवडणूक खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhonsle) आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी राजकीय वातावरण निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. याचीच झलक गेल्या काही दिवसांपासून सातारकर जनतेला पाहायला मिळत आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन दोन्ही नेत्यांनी आरोप प्रत्यारोप सुरु केले आहेत. उदयनराजे भोसले यांची सध्या सातारा नगरपालिकेत सत्ता आहे. उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला शिवेंद्रराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीचं आव्हान आहे. सातारा नगरपालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दोन्ही नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत असाच एक वाद सध्या साताऱ्यात सुरु आहे.

…म्हणून त्यांनी गरळ ओकली: उदयनराजे भोसले

खासदार उदयनराजे भोसले यांनी 9 मार्चला काढलेल्या पत्रकात साबळेवाडी येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रराजे यांच्या बाबत कोणतही विधान केले नसल्याचे स्पष्ट करत सहकारी सहकारी संस्था या सभासद जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केल्या जातात. सभासदांचे जीवनमान उंचावणे हे सहकाराचे मूलतत्व किंवा गाभा आहे.. सहकार तत्वांना तिलांजली देत महाराष्ट्रात काही सहकारी संस्था कशा गिळंकृत केल्या गेल्या याविषयी वस्तुस्थिती मांडली, असल्याचं म्हटलं. जे प्रकार घडले आहेत त्याची आम्ही फक्त जाहीर वाच्यता केली या वाच्यते मध्ये कोणत्या आमदारांचे किंवा कोणत्या कारखान्यात नामोल्लेख आम्ही केलेला नव्हता तथापि खाई त्याला खवखवे या उक्तीप्रमाणे उदयनराजे कोण असा प्रतिप्रश्न ते करीत असतील तर त्यांच्या मनात खोट आहे म्हणून त्यांनी गरळ ओकली आहे ,असा घणाघात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पत्रकात केला होता

उदयनराजे भोसलेंची ती सपशेल माघार, बोलताना विचार करावा: शिवेंद्रराजे भोसले

सातारा नगरपालिका निवडणूक जवळ येताच उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. उदयनराजे भोसले यांच्या पत्रकावर आमदार शिवेंद्रराजे यांनी प्रतिक्रिया देत खासदार उदयनराजे यांनी माझं नाव आणि अजिंक्यतारा कारखान्याचे नाव घेऊन उल्लेख केला हे सर्व चॅनेल वर चालू होतं.. त्यावेळी मी प्रतिक्रिया दिल्यावर उदयनराजेंना जास्त झोम्बलं म्हणून त्यांनी सपशेल माघार घेतल्याचे पत्रक काढल.. एखादं बोललं असेल तर ठरल्या प्रमाणे अगोदर बोलायचं आणि नंतर माघार घ्यायची आणि मी बोललोच नाही म्हणायचं असे सांगत उदयनराजेंवर निशाणा साधलाय.. मी स्वतःहून उदयनराजेंना कधी बोललो नाही पण ते जर बोलले तर त्याला उत्तर देणे मला क्रमप्राप्त आहे.. उदयनराजेंनी बोलताना विचार करावा असा चिमटा देखील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी काढलाय.

इतर बातम्या:

Kolhapur Assembly ByElection : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, कधी होणार मतदान?

‘आरोप सिद्ध झाल्याशिवाय नवाब मलिकांचा राजीनामा नाही’, जयंत पाटील यांचा पुनरुच्चार, भाजपवर निशाणा

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.