Video : आमदार राजू नवघरे वादात, घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला!

आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.

Video : आमदार राजू नवघरे वादात, घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला!
आमदार राजू नवघरेंचा व्हिडीओ व्हायरल


हिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतिक आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांनी केलेल्या एका कृतीमुळे ते चांगलेच वादात सापडले आहेत. वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा 14 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याचं वसमत शहरात आगमन झालं त्यावेळी राजू नवघरे यांनी भावनेच्या भरात थेत घोड्यावर चढून शिवरायांना हार घातला. नवघरे यांच्या या कृतीमुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (NCP MLA Raju Navghare in controversy)

वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला 14 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जामार आहे. 9 ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. आज दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.

राजू नवघरेंना रडू कोसळलं, शिवप्रेमींची माफीही मागितली

दरम्यान, या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजू नवघरे यांना आपली चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत माफी मागितली आहे. यावेळी नवघरे यांना रडू कोसळलं. ‘मी एकट्यानं पाप केलं असेल तर मला फाशी द्या. अनेकजण माझ्यासोबत शिवाजी महाराजांना हात घालण्यासाठी घोड्यावर चढले होते. तर माझ्या एकट्यावर टीका का?’ असा सवाल त्यांनी केलाय. त्याचबरोबर ‘मला माझी चूक लक्षात आली असून मला माफ करा’, अशा शब्दात त्यांनी सर्व शिवप्रेमींची माफी मागितली आहे.

इतर बातम्या :

बीडसाठी कुणी काय केलं? पंकजा मुंडे म्हणतात आता एका शेतकऱ्याला 98 पैसे विमा आला!

पवार म्हणाले मी मुख्यमंत्री होतो ते लक्षात नाही, आता फडणवीस म्हणाले, मी सलग 5 वर्षे होतो ना? पवारांच्या दुखऱ्या नसीवर बोट?

NCP MLA Raju Navghare in controversy

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI