‘हेच कपिल पाटील फडणवीस, मोदींविरोधात बोलणारे म्हणून प्रसिद्ध होते’, विनायक राऊतांचा पलटवार

शिवसेनेचे खासदार दिल्लीत भेटल्यावर चर्चा करतात की कधी महाविकास आघाडीचं सरकार पडतं, असं कपिल पाटील यांनी म्हटलंय. पाटलांच्या या खळबळजनक वक्तव्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

'हेच कपिल पाटील फडणवीस, मोदींविरोधात बोलणारे म्हणून प्रसिद्ध होते', विनायक राऊतांचा पलटवार
कपिल पाटील, विनायक राऊत


मुंबई : भाजपच्या ओबीसी जागर अभियानाच्या कोकण विभागीय मेळाव्यात केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शिवसेना खासदारांबाबत एक रळबळजनक वक्तव्य केलंय. शिवसेनेचे खासदार खासगीत भेटल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात. इतकंच नाही तर शिवसेनेचे खासदार दिल्लीत भेटल्यावर चर्चा करतात की कधी महाविकास आघाडीचं सरकार पडतं, असं कपिल पाटील यांनी म्हटलंय. पाटलांच्या या खळबळजनक वक्तव्याला आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. हेच कपील पाटील देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींविरोधात बोलणारे म्हणून प्रसिद्ध होते, असा पलटवार राऊतांनी केलाय. (Vinayak Raut’s reply to Union Minister of State Kapil Patil’s claim about Shivsena MP)

विनायक राऊतांचं कपिल पाटलांना प्रत्युत्तर

कपिल पाटील यांच्या बेताल वक्तव्याला आम्ही फारसं महत्व देत नाही. कारण हेच कपिल पाटील खासदार होते तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ते बोलत होते. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणारे म्हणून त्यांची ख्याती होती. शिवसेनेचे खासदार अनेकवेळा येतात, मंत्र्यांना भेटतात, त्यांच्या मतदारसंघातील कामं करायची असतात. आम्ही पंतप्रधान मोदींनाही भेटत असतो. हे कपिल पाटील त्यावेळी काय तिथे वास काढत बसलेले असतात का? असा माझा प्रश्न आहे. क्षमता नसताना असं मंत्रिपद मिळालं की त्यांचे हात स्वर्गाला टेकल्यासारखे होतात, त्यातील एक कपील पाटील आहेत. पब्लिसिटी त्यांनी हे वक्तव्य केलंय. शिवसेनेविरोधात बोललं की मिडीया कव्हरेज मिळतं, हे त्यांना माहिती आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कपिल पाटलांना लगावलाय.

कपिल पाटील नेमकं काय म्हणाले?

‘शिवसेनेचे खासदार अनेकवेळा भेटतात. त्यांच्या खासगीतील चर्चा, कमेंट्स आहेत, त्यांनाच असं वाटतं की हे सरकार कधी पडतंय. अशा प्रकारची भावना त्यांची झाली आहे. आणि एक गोष्ट ते अतिशय जबाबदारीने उल्लेख करतात की जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे जात होतो, आम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही कामाला कधीच नकार आला नाही. कधीच त्रास झाला नाही. ही काम करण्याची पद्धत या मुख्यमंत्र्यांची होती’, असं वक्तव्य कपिल पाटील यांनी भाजपच्या ओबीसी मेळाव्यात बोलताना केलंय.

इतर बातम्या :

गाव जेवण एक दिवस देणार की पुढील तीन वर्षे? चंद्रकांतदादांच्या ऑफरवर अशोक चव्हाणांचा सवाल

‘ईडी हा विषय आता नेहमीचा झालाय, घाबरण्याचं कारण नाही’, चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला नाना पटोलेंचं उत्तर

Vinayak Raut’s reply to Union Minister of State Kapil Patil’s claim about Shivsena MP

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI