West Bengal Election Result : दीदींसोबत बंगालमध्ये मोठा खेला, 2 ग्राफिक्समधून समजून घ्या सगळं गणित
West Bengal Election Result :पश्चिम बंगालमध्ये भाजपं सत्तेवर येणं ही मोठी बाब आहे. पश्चिम बंगाल हा आधी डाव्यांचा गड समजला जायचा. 2011 साली ममता बॅनर्जी यांनी डाव्यांचा हा किल्ला भेदला. त्यानंतर आता 15 वर्षांनी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता खेचून आणली आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलं आहे. सगळ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालच्या निकालाकडे लागलं आहे. मतमोजणी सुरु होऊन तीन तासापेक्षा जास्त वेळ झाला आहे. भाजपची वाटचाल एका मोठ्या आघाडीच्या दिशेने सुरु आहे. 294 सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत भाजप 175 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असून तृणमुल 105 च्या पुढे आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर काँटे की टक्कर दिसत होती. पण आता हळूहळू तृणमुल पिछाडीवर पडत चालली आहे. 15 वर्षांपासूनच्या ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमधील सत्तेला सुरुंग लावण्यात भाजप यशस्वी ठरली आहे. सत्तेवर येण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये 147 हा बहुमताचा आकडा आहे. भाजप त्यापेक्षा जास्त जागा जिंकेल असं चित्र आहे.
भाजपने यावेळी ग्रामीण आणि शहरी दोन्ही पट्ट्यातून मोठ्या प्रमाणात मतं मिळवली आहेत. पश्चिम बंगालमध्ये यावेळी रेकॉर्ड ब्रेक मतदान झालं होतं. पहिल्या टप्प्यात 90 टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालं. त्याचवेळी पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांची सत्ता जाणार हे संकेत मिळालं होतं. तृणमुल काँग्रेसच्या परंपराग मतपेटीला भाजपने मोठा हादरा दिलाय. ओदिशा आणि बिहारनंतर आता पूर्व भारतातही भाजपचं प्रभुत्व अधिक भक्कम होणार आहे.

West Bengal
ते स्वप्न पूर्ण केलं
पश्चिम बंगालमध्ये भाजपं सत्तेवर येणं ही मोठी बाब आहे. पश्चिम बंगाल हा आधी डाव्यांचा गड समजला जायचा. 2011 साली ममता बॅनर्जी यांनी डाव्यांचा हा किल्ला भेदला. त्यानंतर आता 15 वर्षांनी भाजपने पश्चिम बंगालमध्ये सत्ता खेचून आणली आहे. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. ते भाजपने आताच्या निवडणुकीत पूर्ण केलं आहे.

रणनिती आखून प्रचार
भाजपने आपली सर्व क्षमता, तंत्र वापरलं. त्याचा फायदा झाला. भाजपच्या वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी तिथे जाऊन प्रचार केला. त्याचा फायदा भाजपला झाला. भाजपने या निवडणुकीची संघटनात्मक पातळीवर खूप आधीच तयारी केली होती. रणनिती आखून प्रचार केला. ममता बॅनर्जींसमोर भाजपने रे ला कारे केलं. तिथल्या लोकांना विश्वास दिला आणि आज एक मोठ्या विजयाकडे भाजपचा प्रवास सुरु आहे.
