AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋतुजा लटके यांच्याबाबतीत ‘हे’ पहिल्यांदाच घडणार; कोणत्या 5 कारणांमुळे ठाकरे गटासाठी अंधेरीची निवडणूक महत्त्वाची?

या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते शिवसेनेकडे ट्रान्स्फर होतात का हेही दिसून येणार आहे. त्यावर पुढील महापालिका निवडणुकीची गणितं ठरणार आहेत.

ऋतुजा लटके यांच्याबाबतीत 'हे' पहिल्यांदाच घडणार; कोणत्या 5 कारणांमुळे ठाकरे गटासाठी अंधेरीची निवडणूक महत्त्वाची?
ऋतुजा लटके यांच्याबाबतीत 'हे' पहिल्यांदाच घडणारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 14, 2022 | 2:42 PM
Share

मुंबई: दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (rutuja latke) या उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी होणार आहे. ही पोटनिवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याने या निवडणुकीकडे केवळ राज्याचच नव्हे तर देशाचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे. तर दुसरीकडे भाजपची (bjp) आणि शिंदे गटाचीही प्रतिष्ठापणाला लागणार आहे. मात्र, मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार हे येत्या 6 नोव्हेंबर रोजीच्या निकालात दिसून येणार आहे.

ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत आहे. या निमित्ताने त्यांच्या नावावर अनेक गोष्टी जमा होणार आहेत. पहिल्यांदाच काही गोष्टी त्यांच्या बाबतीत घडणार आहेत. एक म्हणजे शिवसेना फुटीनंतर निवडणूक लढणाऱ्या त्या ठाकरे गटाच्या पहिल्या महिला उमेदवार ठरणार आहेत.

शिवसेना फुटल्यानंतर राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. पण ग्रामपंचायतीची गणितं ही स्थानिक पातळीवर ठरली जातात. कुणाला उमेदवारी द्यायची आणि कोणत्या पक्षाशी युती/आघाडी करायची हे स्थानिक पातळीवरील नेते ठरतात. या पार्श्वभूमीवर अंधेरी विधानसभेची पोटनिवडणूक ही पहिली मोठी निवडणूक आहे. आणि ही निवडणूक लढवण्याचा मान ठाकरे गटात ऋतुजा लटके यांना मिळाला आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे, या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे गट मशाल चिन्हावर लढत आहे. पहिल्यांदाच मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मानही ऋतुजा लटके यांना मिळाला आहे. 1985मध्ये तत्कालीन शिवसेना नेते छगन भुजबळ हे मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढले होते आणि जिंकले होते. आज 37 वर्षानंतर ऋतुजा लटके या मशाल चिन्हावर पुन्हा एकदा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे मशाल चिन्हावर लढणाऱ्याही त्या ठाकरे गटाच्या पहिल्या कार्यकर्त्या ठरणार आहेत.

अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीतून ठाकरे गट आपली ताकद दाखवणार आहे. या निवडणुकीनंतर लगेचच राज्यात महापालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यातही मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने ठाकरे गटाला अंधेरीतून विजय मिळवावा लागणार आहे.

अंधेरीतील विजयाने मुंबईत आमचीच ताकद अधिक असल्याचं ठाकरे गटाला ठसवता येणार आहे. या निवडणुकीत विजय मिळाल्यास ठाकरे गटात प्राण फुंकले जाणार आहे. तसेच या विजयामुळे ठाकरे गटाला मुंबईत वातावरण निर्मिती करता येणार आहे.

या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची प्रतिष्ठा लागणार आहे. शिंदे गटाची मुंबईत ताकद नाही. पण भाजपला मुंबई महापालिका जिंकायची आहे. त्यामुळे त्यांना ही निवडणूक जिंकायचीच आहे. त्यामुळेच भाजपने अपक्ष राहिलेल्या मुरजी पटेल यांना पक्षात प्रवेश देऊन तिकीट दिलं आहे.

गुजराती, मराठी आणि हिंदी भाषिकांची मते एकत्र मिळवण्याचं भाजपचं समीकरण आहे. हे समीकरण यशस्वी व्हावं यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत. ते यशस्वी झाल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला याच रणनितीवर खेळता येणार आहे. म्हणून भाजपसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. तर, ठाकरे गटाने या निवडणुकीत भाजपचा पराभव केल्यास भाजपला हा मोठा सेटबॅक असू शकणार आहे.

या निवडणुकीच्या माध्यमातून ऋतुजा लटके या ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीच्या पहिल्या उमेदवार (शिवसेना फुटीनंतरच्या) ठरल्या आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते शिवसेनेकडे ट्रान्स्फर होतात का हेही दिसून येणार आहे. त्यावर पुढील महापालिका निवडणुकीची गणितं ठरणार आहेत.

संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन
नागपूर पारडीत बिबट्याचा थरार, जेरबंद करण्यास असं सुरू रेस्क्यू ऑपरेशन.
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.