Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Jitendra Awhad on Rashmi Shukla : आयपीएस रश्मी शुक्ला का रडल्या? जितेंद्र आव्हाड म्हणतात...
Follow us
| Updated on: Mar 24, 2021 | 8:34 PM

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. रश्मी शुक्ला आपल्यावर कारवाई होऊ म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासमोर रडल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसेच आघाडी सरकारने देखील मन मोठं करुन तेव्हा त्यांना माफ केल्याचं सांगितलं. मात्र, त्या काही दिवसांनी बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नसल्याचंही आव्हाड म्हणाले. ते मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते (Why Rashmi Shukla cry Jitendra Awhad explain reasons behind it).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “रश्मी शुक्ला यांना जेव्हा फोन टॅपिंगच्या पत्राविषयी समजलं तेव्हा आपण पकडलो गेलो आहोत हे त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रडल्या. त्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे गेल्या तेथेही त्या रडल्या. त्यांनी माफी मागत कारवाई करु नये, अशी विनंती केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार दिलदार आहे. त्यामुळे मन मोठं करुन आघाडी सरकारने तेव्हा रश्मी शुक्ला यांना माफ केलं. मात्र, त्यावेळी याच रश्मी शुक्ला समोर उभ्या राहून नवं बदनामीचं षडयंत्र रचतील हे माहिती नव्हतं.”

रश्मी शुक्ला यांनी ज्या बदल्यांची यादी दिली आहे. त्यातील 90 टक्के बदल्या झालेल्याच नाहीत. मग आरोप कशाचे आहेत? असाही सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

‘परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केंद्र सरकारने काही नियम दिले आहेत. त्यात कोणत्या प्रकारात फोन टॅप करता येतात याविषयी सांगण्यात आले आहे. यात राष्ट्र घातक कृत्य, परकीय देशातील अतिरेकी संघटनेशी संबंध या प्रकारांशिवाय इतर परिस्थिती फोन टॅपिंग करता येत नाही. याला अपवाद येथी शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीचा फोन टॅप करु शकतो. त्यामुळे रश्मि शुक्ला यांनी जी कारणं दिली होती ती संयुक्तिक नव्हती. त्यांनी ज्या फोन टॅपिंगच्या परवानग्या घेतल्या त्या चुकीच्या नावाने घेतल्या होत्या. परवानगी एकाच्या नावाची आणि फोन टॅपिंग दुसऱ्याची असा प्रकार करण्यात आला. यात अनेक मंत्र्यांचेही फोन टॅप करण्यात आले. हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे. हे अनेकवेळा करण्यात आलं.”

‘रश्मी शुक्लांनी नोकरशाहांचा विश्वासघात करुन गद्दारी केली’

“फोन टॅप करुन ठेवायचे आणि त्याचा नंतर वापर करायचा हे सर्व प्रकार रश्मी शुक्ला यांनी केले आहेत. रश्मी शुक्ला यांनी आपल्यावरील वरिष्ठ नोकरशाहांचा विश्वासघात करुन गद्दारी केली आणि पोलीस विभाग आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलं. त्यानंतर त्याला बदल्यांमधील भ्रष्टाचाराची जोड दिली. ज्यांच्या बदल्या झाल्या ती नावं इतके चिल्लर आहेत की त्यांचे फोनही कुणी घेणार नाहीत. त्यातला महादेव इंगोले कोण आहे हे तुम्ही शोधा, तो कुणाशी संबंधित आहे. हे एक षडयंत्र रचलं गेलंय,” असंही त्यांनी नमूद केलं.

रश्मी शुक्ला महाविकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राच्या मुख्य

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “निष्कारण टॅपिंगच्या नावाखाली बदल्या, बदल्यांच्या नावाखाली मोठं रॅकेट असं महाराष्ट्र विकास आघाडीला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा मुख्य कोणी असेल तर त्या रश्मी शुक्ला आहे.”

हेही वाचा :

अनेक मंत्र्यांचे फोन टॅप, जितेंद्र आव्हाडांचे आयपीएस रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप

रश्मी शुक्ला भाजपच्या एजंट, बेकायदेशीरपणे विरोधकांचे फोन टॅप करायच्या; राष्ट्रवादी काँग्रेसचा पलटवार

परमबीर सिंगांचा दुसरा मोठा दावा, रश्मी शुक्लांनीही देशमुखांच्या भ्रष्टाचाराची माहिती दिली होती!

व्हिडीओ पाहा :

Why Rashmi Shukla cry Jitendra Awhad explain reasons behind it

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.