गांधी कुटुंबासाठीही पाच राज्यांतली आजचे मतदान निर्णायक ठरणार?

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आज मतदान होत आहे. (why this phase assembly elections is important for congress and gandhi family?)

गांधी कुटुंबासाठीही पाच राज्यांतली आजचे मतदान निर्णायक ठरणार?
rahul gandhi

नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत आज मतदान होत आहे. पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. आज होणारं मतदान गांधी कुटुंबासाठीही तितकेच महत्त्वाचं आहे. काँग्रेसमधील पक्षांतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर गांधी कुटुंबासाठी या पाच राज्यांच्या निवडणुका निर्णायक ठरणार आहेत. या निडणुकीतील यश-अपयशावर गांधी घराण्याचं काँग्रेसवरील पकड राहणार की नाही हे सुद्धा ठरणार आहे. (why this phase assembly elections is important for congress and gandhi family?)

2019च्या जनमताचा कौल आल्यापासूनच काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून वाद सुरू आहेत. त्यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून आतापर्यंत पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. केवळ लोकसभा निवडणुकीपुरतंच काँग्रेसवर हे संकट नव्हतं तर मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार जाऊन तिते भाजपचं सरकार आलं. यापूर्वी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची कामगिरी चांगली नव्हती. राजस्थानमध्येही काँग्रेसचं सरकार जाणार असल्याची स्थिती निर्माण झाली होती. पण सरकार वाचलं. पण त्याचं श्रेय दिल्लीतील नेत्यांना जात नसून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना जातं.

बिहारमध्ये खराब कामगिरी

2020च्या अखेरीस बिहार विधानसभेच्या निवडणुका झाल्या. यावेळी काँग्रेसमधील बंडाळी उघड झाली. लेटर बॉम्ब आणि पक्षांतर्गत आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बिहारच्या निवडणुका लढल्या. मात्र, काँग्रेसच्या हाती मोठा विजय लागला नाही. तसेच किंगमेकर होता येईल एवढ्या सीटही त्यांना जिंकता आल्या नाहीत.

काँग्रेसमध्ये अलबेल नाही

दरम्यान, प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात पक्ष बांधणीवर चांगला जोर दिला आहे. पण त्यात त्यांना काहीच यश मिळताना दिसत नाही. पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. दुसरीकडे प्रियंका गांधी आणि राहुल गांधी या दोन नेत्यांनीच पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहे. मात्र, त्यातही त्यांनी केरळ आणि आसाम या दोनच राज्यांवर अधिक फोकस ठेवला आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा तिसरा टप्पा आला तरी राहुल किंवा प्रियंका गांधी यांनी एकही प्रचारसभा घेतलेली नाही. काँग्रेसचा कोणताही बडा नेता या राज्यांमध्ये प्रचार करताना दिसत नाही. त्यामुळे पक्षात सारं काही अलबेल नसल्याचं दिसून येत आहे. या पाच राज्यात काँग्रेसने चांगली कामगिरी केली तर गांधी घराण्याची काँग्रेसवरील पकड अधिक मजबूत होईल आणि राहुल गांधी यांच्या पक्षाध्यक्षपदाचा मार्गही मोकळा होईल. मात्र, काँग्रेसची खराब कामगिरी झाल्यास काँग्रेसमधील वाद अधिक तीव्र होतील, त्यामुळे या निवडणुका गांधी कुटुंबासाठी निर्णायक आहेत, असं राजकीय जाणकाराचं म्हणणं आहे. (why this phase assembly elections is important for congress and gandhi family?)

 

संबंधित बातम्या:

Bengal Election: शारदा चिट फंडप्रकरणी तृणमूलच्या दोन नेत्यांची 3 कोटींची संपत्ती जप्त; ईडीचा मोठा झटका

Farmer Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या, गोळी चालवल्याचाही आरोप!

रॉबर्ट वाड्रा पॉझिटिव्ह, प्रियंका गांधी आयसोलेट; सर्व प्रचारसभा रद्द

(why this phase assembly elections is important for congress and gandhi family?)