Eknath Shinde : होय, मी कंत्राटीच मुख्यमंत्री पण…, मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

राजेंद्र खराडे

राजेंद्र खराडे |

Updated on: Aug 25, 2022 | 6:06 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्या भाषणापासून सभागृह गाजिवलेले आहे. शिवाय पावसाळी अधिवेशनातही सरकारचे मुद्दे माडून त्यांनी विरोधकांच्या आरोपाला आणि टीकेला जशाच तसे उत्तर दिले आहे. कंत्राटी मुख्यमंत्री टीका झाल्यावर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

Eknath Shinde : होय, मी कंत्राटीच मुख्यमंत्री पण..., मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : बंडखोरीनंतर काही दिवस आमदारांनी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलण्यास टाळले होते. शिवाय (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे कुटुंबीयांबद्दल बोलताना अपशब्द वापरु नये अशा सूचना दिल्या होत्या. पण आता या दोन्ही गटातील अंतर वाढत गेले असून मुख्यमंत्री आणि ठाकरे यांच्यात आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाले आहेत. मध्यंतरी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख यांनी राज्यात कंत्राटीकरण कसे वाढले जात आहे. याची उदाहरणे दिली होती. प्रत्येक गोष्टीचे कंत्राट निघत असेल तर राज्यकर्तेही कंत्राटीच करा असे म्हणत त्यांनी (State Government) राज्य सरकारवर टीकास्त्र केले होते. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तसेच उत्तर दिले आहे. मी कंत्राटीच मुख्यमंत्री पण राज्याच्या विकासाचे आणि बाळासाहेबांच्या विचार जोपसण्याचे कंत्राट घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. विकासाचे ठीक आहे पण बाळासाहेबांच्या विचाराचे म्हणत त्यांनी पुन्हा ठाकरेंची कोंडी केली आहे.

काय म्हणाले होते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे?

राज्य सरकारकडून सर्वच बाबी आता कंत्राट देऊन पूर्ण केल्या जात आहेत. कंत्राटीकरण केवळ कंत्राटदारांना पोसण्यासाठी वाढवले जात आहे. त्यामुळे सर्वच गोष्टी कंत्राटी पद्धताने पूर्ण करुन घ्यावयाच्या असतील तर राज्यकर्तेही कंत्राटी म्हणूनच नेमा, शिवाय मुख्यमंत्री तरी कशाला निवडायचा आहे, ते पदही कंत्राटी पद्धतीने अंमलात आणावे असे विधान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना उद्देशून केले होते. याच विधानावर आज मुख्यमंत्री सभागृहात बोलले असून त्यांनीही जशाच तशे उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने ठाकरेंची कोंडी..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पहिल्या भाषणापासून सभागृह गाजिवलेले आहे. शिवाय पावसाळी अधिवेशनातही सरकारचे मुद्दे माडून त्यांनी विरोधकांच्या आरोपाला आणि टीकेला जशाच तसे उत्तर दिले आहे. कंत्राटी मुख्यमंत्री टीका झाल्यावर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते. होय, मा कंत्राटी मुख्यमंत्रीच पण राज्यातील विकास कामाचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे कंत्राट घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी टीकेला उत्तर तर दिलेच पण ठाकरे यांची कोंडीही केली.

हे सुद्धा वाचा

राणेंची बाजू, ठाकरेंवर टीका

महाविकास आघाडी काळात राज्यात हुकुमशाही कशी होती याचे दाखले एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिवाय हे करीत असताना त्यांनी नारायण राणे यांचेच उदाहरण दिले. राणे यांनी केवळ माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख केला तर त्यांना जेलमध्ये टाकेल. भरल्या ताटावरुन त्यांना उठवले गेले. ही कसली लोकशाही असे म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तर बहुमत सिद्ध करुनच आपण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याचे म्हणत त्यांनी टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI