पुणे विधानसभा निवडणूक : 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election Announcement) आचारसंहिता जाहीर होताच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा घेतला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत (Voters).

पुणे विधानसभा निवडणूक : 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावतील

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी (Maharashtra Assembly Election Announcement) आचारसंहिता जाहीर होताच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया आणि सुरक्षेचा आढावा घेतला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 76 लाख 86 हजार 636 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत (Voters). यामध्ये युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. लोकसभेनंतर तरुण मतदारांमध्ये 60 हजारांच्यावर वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत तब्बल 1 लाख 34 हजार 666 तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत (Young voters). तर तब्बल 70 हजार कर्मचारी ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कार्यरत असेल.

जिल्ह्यात एकूण 7,920 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यंदा सर्व मतदान तळमजल्यावर घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर दुर्गम भागात ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या असेल तिथे वायरलेस आणि सॅटेलाईट फोनचाही वापर करण्यात येणार आहे.

जिल्हा प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनानेही निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. पुणे शहरात तब्बल 190 अतिसंवेनशील मतदान केंद्र आहेत. त्याचबरोबर 6 हजार 548 शस्त्र परवाना असून छाननी करुन शस्त्र ताब्यात घेणार आहेत. निवडणुकीसाठी तब्बल सहा हजारपेक्षा जास्त पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

पुणे पोलिसांनी निवडणुकीपूर्वी 2,115 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. तर पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल साडे तीन हजार गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात 3 हजार 825 शस्त्र परवानाधारक आहेत. ते ही छाननी करुन ताब्यात घेण्यात येणार आहे. तर 59 तडीपार प्रस्ताव आहे, तर चार जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. मोक्काचे तीन प्रस्ताव असून 20 पिस्तूल जप्त केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केेलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या आहेत. यासोबतच दोन्ही राज्यांत आदर्श आचारसंहिता 21 सप्टेंबरपासूनच लागू झाली आहे.

महाराष्ट्रातील 288 जागांसाठी एकाच टप्प्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर धनत्रयोदशीच्या आदल्याच दिवशी म्हणजे 24 ऑक्टोबरला निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. महाराष्ट्रात एकूण 8.94 कोटी, तर हरियाणामध्ये 1.28 कोटी मतदार आहेत. राज्यात 1.84 लाख ईव्हीएम मतदान प्रक्रियेत वापरली जातील. प्रत्येक ठिकाणी पाच व्हीव्हीपॅट स्लिप मोजल्या जाणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना जारी करण्याची तारीख – शुक्रवार 27 सप्टेंबर 2019
नामांकन अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख – बुधवार 4 ऑक्टोबर 2019
अर्जाची छाननी गुरुवार 5 ऑक्टोबर 2019
अर्ज मागे घेण्याची तारीख – शनिवार 7 ऑक्टोबर 2019
मतदान – सोमवार 21 ऑक्टोबर 2019
मतमोजणी – गुरुवार 24 ऑक्टोबर 2019

संंबंधित बातम्या :

टीव्ही 9 मराठीचा सर्वात मोठा पोल, महाराष्ट्रात लाट कुणाची?

राज्य निवडणूक आयोगाचा जोश हाय, यंत्रणा सज्ज, निवडणुकीसाठी 850 कोटीचा खर्च अपेक्षित

निवडणुका जाहीर, पण मतदान ओळखपत्र नाही? सोपे पर्याय-

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *