AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 14 March 2024 : आजचे राशी भविष्य, नात्यात गोडवा वाढवायचा असेल तर ‘या’ राशीच्या लोकांनी कुटुंबासोबत घालवावा वेळ !

या राशीच्या विद्यार्थ्यांनी नियोजन करून तयारी केली तर करिअरच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल.

Horoscope Today 14 March 2024 : आजचे राशी भविष्य,  नात्यात गोडवा वाढवायचा असेल तर 'या' राशीच्या लोकांनी कुटुंबासोबत घालवावा वेळ !
| Updated on: Mar 14, 2024 | 7:00 AM
Share

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 14 March 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

मेष

आज तुमच्या आयुष्यात काही नवीन बदल होऊ शकतात. व्यवसायात काही चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखू शकता.एखाद्या जुन्या मित्राची भेट होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस चांगला जाईल.

वृषभ

आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असेल. नियोजित सर्व कामे पूर्ण होतील. व्यवसायात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहितांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. शिक्षणाशी संबंधित सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच, वैद्यकीय स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ लवकरच मिळू शकेल. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळाल्याने तुमचा बँक बॅलन्स मजबूत होईल. गरज पडल्यास भावंडांची मदत घ्याल.

मिथुन

आजचा दिवस छान जाईल. काही चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन नियोजनाबाबत मोठा निर्णय घेऊ शकता. मुलांकडूनही चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक सुख-शांती राहील. कार्यालयातील कोणतीही गुंतागुंतीची बाब असेल तर ती सोडवता येईल. ऑफिसच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित नवीन लोकांशी संपर्क साधण्याची संधी मिळू शकते.

कर्क

आज तुमच्या मनात कामानिमित्त नव्या कल्पना येऊ शकतात. जास्त कामामुळे तुमचा ताणही थोडा वाढू शकतो. संध्याकाळी मुलांसोबत वेळ घालवल्यावर बरं वाटलेय मालमत्तेसाठी तुम्हाला चांगली डील मिळू शकते. ऑफीसची कामं घाईत करणं टाळावं. तुमच्याकडून काही चुका होण्याची शक्यता आहे.

सिंह

आज दिवस सामान्य जाईल. आर्थिक बाबतीत हुशारीने वागणे इष्ठ ठरेल. जोडीदाराचा सल्ला घेणेही फायदेशीर ठरेल. व्यवसायात नवीन प्रकल्प राबवून तुम्हाला फायदा होऊ शकतो. ऑफिसमधील सहकाऱ्याशी वाद घालणे टाळावे. पैशाशी संबंधित मोठे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. याचा तुम्हाला खूप फायदा होईल.

कन्या

तुमचा आजचा दिवस उत्तम जाईल. कामाच्या बाबतीत परिस्थिती चांगली राहील. निरोगी रहाल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी सहलीला जाऊ शकता, यामुळे तुमच्या नात्याची मजबूती कायम राहील. तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल. तुमच्या मेहनतीवर आई-वडील खूश होतील. तुम्हाला तुमच्या सर्व कामात त्यांचा पाठिंबाही मिळेल. चांगल्या निकालासाठी शिक्षकही तुमच्या पाठीशी उभे राहतील. तुमच्या मेहनतीमुळे व्यवसायाचा विस्तार होण्यात यश मिळेल.

तूळ

आज दिवस संमिश्र जाईल. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. एखाद्याशी बोलताना विनम्रतेने बोलावे, यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित राहतील. या राशीच्या बिल्डर्सना नवीन प्रोजेक्टचा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती सामान्य राहील. थकवा जाणवू शकतो. तुमची जीवनशैली बदलण्याची आणि तुमच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वृश्चिक

आज तुमचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला जाईल. स्वतःच्या मेहनतीने तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. काही महत्त्वाच्या कामात यश मिळू शकते. या राशीच्या मीडियाशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाबद्दल तुमचा बॉस तुमची प्रशंसा करू शकतो. प्रियजनांसमोबत बाहेर जायचे प्लान ठरतील.

धनु

आज तुमचा दिवस चांगला जाईल. तुमचे मनोबल वाढल्याने महत्त्वाच्या कामात यश मिळेल. पालकांच्या सहकार्याने व्यवसायात प्रगती होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. कामाच्या ठिकाणी तुमचे मन प्रसन्न राहील.

मकर

आज दिवस ठीक जाईल. वैयक्तिक गोष्टी इतरांसोबत शेअर करणे टाळावे. काही अडचणी येऊ शकताच. काही सामाजिक बाबींमध्ये हातभार लावल्यास तुमच्याबद्दल आदर वाढू शकतो. या राशीच्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. अभ्यासात तुमची आवड वाढू शकते. नोकरीत उच्च अधिकारी तुमची प्रशंसा करतील, परंतु आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चढ-उताराचा असेल.

कुंभ

आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. व्यवसायातही तुम्हाला आर्थिक लाभ होईल. तुमची अशी एखादी व्यक्ती भेटू शकते ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल. तुमच्या सर्जनशीलतेने लोक प्रभावित होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नातेवाईक तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. वैवाहिक जीवनातील लोकांसाठी परिस्थिती अधिक अनुकूल असेल.

मीन

आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही आत्मविश्वासाने वागाल. काही रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमच्या कामाच्या ठिकाणी वाढीची संधी मिळू शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांनी नियोजन करून तयारी केली तर करिअरच्या प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल. व्यवसायात नवीन करार होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.