AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

30 वर्षानंतर शनि चंद्रामुळे विष योग, 12 ऑगस्टपासून या राशींच्या अडचणीत होणार वाढ

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांची स्थिती बदलली की शुभ अशुभ योग तयार होत असतात. असा एक योग 30 वर्षानंतर मीन राशीत तयार होत आहे. त्यामुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कसं काय ते जाणून घ्या..

30 वर्षानंतर शनि चंद्रामुळे विष योग, 12 ऑगस्टपासून या राशींच्या अडचणीत होणार वाढ
30 वर्षानंतर शनि चंद्रामुळे विष योग, 12 ऑगस्टपासून या राशींच्या अडचणीत होणार वाढ
| Updated on: Aug 10, 2025 | 8:51 PM
Share

ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीचा अभ्यास करून शुभ अशुभ योगांची मांडणी केली जाते. 30 वर्षानंतर शनि ग्रह मीन राशीत विराजमान आहे. शनि महाराज अडीच वर्षे या राशीत असणार आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत दर महिन्याला शनि आणि चंद्रांची युती या राशीत होणार आहे. कारण चंद्र अडीच दिवसानंतर गोचर करतो असतो. एका राशीत पुन्हा येण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. मीन राशीत चंद्र आणि शनिची युती होणार आहे. त्यामुळे विष योग तयार होणआर आहे. त्यामुळे काही राशींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या विष योगाचा कोणत्या राशींना फटका बसणार ते…

मेष : या राशीच्या 12व्या स्थानात शनि आणि चंद्राची युती होणार आहे. हा विष योग असल्याने वायफळ खर्च वाढेल. या काळात तु्म्हाला नशिबाची हवी तशी साथ मिळणार नाही. भागीदारीच्या धंद्यात फसवणूक किंवा तोटा होऊ शकतो. नोकरीच्या ठिकाणी आपले शब्द जपून वापरा. कारण त्यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकतो. तुमच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ शकतं. या कालावधीत तब्येतीची काळजी घ्या.

मीन : या राशीच्या लग्न स्थानात चंद्र आणि शनिची युती होत आहे. त्यामुळे या अशुभ योगाचा फटका बसेल. आत्मविश्वासात उणीव जाणवेल. एखादं काम हाती घेतलं की ते होईल की नाही याची धाकधूक लागून राहील. या कालावधीत कोणासोबतही वाद घालू नका. कारण यामुळे तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. नाही तर पैसे पुन्हा मिळणं कठीण होऊ शकतं.

सिंह : या राशीला अडीचकी सुरु आहे. शनि महाराज अष्टम स्थानात असून याच घरात युती होत आहे. त्यामुळे अशुभ योगाचा फटका बसू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना सर्वाधिक फटका बसू शकतो. कामाच्या ठिकाणी घेतलेल्या कामात अनेक चुका घडू शकतात. त्यामुळे वरिष्ठांकडून ओरडा पडू शकतो. या कालावधीत मानसिक तणाव वाढू शकतो. तसेच एखाद्या आजाराशी झुंज द्यावी लागू शकते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून राऊत यांचा खोचक टोला.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेनंतर 'विकासा'चा आणखी एक मार्ग झाला बंद.
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती
दुष्काळी तालुक्यात थंड प्रदेशातील राजमाची यशस्वी शेती.
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष
पवार कुटुंबाची विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक; राज्याचं लक्ष.
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक
राजकीयदृष्टीनं सुरू असलेल्या चर्चेवरून दु:ख वाटतं! रोहित पवारांनी व्यक.
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश
2029 साठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज! राज ठाकरेंनी दिले आदेश.
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती
पार्थ पवारांना कोणतीही क्लिनचीट नाही! सूत्रांची माहिती.
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला
नवी मुबंई महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला.
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप
महापौरपदाच्या निवडणुकीत गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंचे नगरसेवकांना व्हीप.
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
गटारातील पाण्यात फळे धुतली; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल.