तब्बल 800 वर्षानंतर अविस्मरणीय योगायोग, या दिवशी आकाशात दिसणार ख्रिसमस स्टार !

येत्या 21 डिसेंबर रोजी आकाशामध्ये ख्रिसमसचा तारा दिसणार आहे, असं अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीच्या खगोलतज्ज्ञांनी सांगितलं

तब्बल 800 वर्षानंतर अविस्मरणीय योगायोग, या दिवशी आकाशात दिसणार ख्रिसमस स्टार !

नवी दिल्ली : यंदाचं वर्ष जगाच्या दृष्टीने प्रचंड निराशाजनक होतं कारण याच वर्षात कोरोनासारख्या महामारीने जगाला रोखून धरलं. परंतु आता वर्षाच्या सरतेशेवटी असलेल्या ख्रिसमस सणाला एक अद्भुत आणि अविस्मरणीय खगोलीय घटना घडणार आहे ज्याचं साक्षीदार संपूर्ण जग असणार आहे. यावर्षी ख्रिमसम अगोदर आकाशामध्ये ख्रिसमस स्टार दिसणार आहे. हा अद्भुत योगायोग दोन-चार वर्षानंतर नाही तर तब्बल 800 वर्षानंतर होतो आहे. (jupiter and saturn will align to create christmas star on 21 dec first time in 800 year)

येत्या 21 डिसेंबर रोजी आकाशामध्ये ख्रिसमसचा तारा दिसणार आहे, असं अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीच्या खगोलतज्ज्ञांनी सांगितलं. या ताऱ्याला ख्रिसमस स्टार किंवा बेथलेहम स्टार असं म्हटलं जातं. 21 डिसेंबर रोजी गुरु आणि शनि आकाशात सरळ रेषेत येतील.

मध्ययुगीन काळापासून, गुरु आणि शनि दोन्ही एकत्र पृथ्वीच्या अगदी जवळ आलेले नाहीत. 20 वर्षानंतर गुरु आणि शनि ग्रह नेहमी सरळ रेषेत येतात, परंतु या वर्षी दुर्लभ घटना म्हणता येईल. कारण हे दोन्ही ग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ येतील आणि संपूर्ण मानवजात त्यांना पाहू शकतील, अशी माहिती अमेरिकेच्या राइस युनिव्हर्सिटीचे खगोलतज्ज्ञ पॅट्रिक हर्टीगन यांनी सांगितली.

यापूर्वी 4 मार्च 1226 रोजी आकाशात ख्रिसमस स्टार दिसण्याची अशी दुर्मीळ घटना घडली होती. 21 डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर 45 मिनिटांनी उत्तर गोलार्धात टेलिस्कोपच्या मदतीने ख्रिसमस स्टार दिसू शकेल. किंबहुना असंही म्हटलं जातंय की हा अद्भुत नजारा पूर्ण आठवडाभर दिसेल. पुढच्या वेळी असं अद्भुत दृश्य 2080 साली दिसेल.

गुरु हा आपल्या सौर मंडळाचा सर्वात मोठा ग्रह आहे. गुरु ग्रह पृथ्वीपेक्षा 11 पट जास्त आणि त्याच्या वस्तुमानापेक्षा 317 पट जास्त आहे. सौर यंत्रणेतील हा चौथा सर्वात चमकणारा ग्रह आहे. याव्यतिरिक्त चमकणाऱ्या ग्रहांमध्ये सूर्य, चंद्र आणि शुक्र आहेत. उघड्या डोळ्याने पाहिल्या जाणार्‍या पाच ग्रहांपैकी शनि एक ग्रह आहे.

(jupiter and saturn will align to create christmas star on 21 dec first time in 800 year)

संबंधित बातम्या

Solar Eclipse Live : खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाची पर्वणी, राजस्थानात कंकणाकृती, महाराष्ट्रात खंडग्रास

Blue Hunter’s Moon 2020 : एकाच महिन्यात दुसऱ्यांदा दिसणारा पूर्णाकृती चंद्राचा दुर्मिळ योग, कधी आणि कोठे पाहाल?