Chanakya Niti | या 3 परिस्थितींमध्ये प्रत्येक व्यक्तीला दु:खाचा सामना करावा लागतो

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या ग्रंथात जीवनाविषयी अशा गूढ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या एखाद्या व्यक्तीने समजून घेतल्या आणि आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर त्याला सर्व त्रास टाळता येतील. तसेच, आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा अंदाज लावून व्यक्ती त्यांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करु शकते.

Chanakya Niti | या 3 परिस्थितींमध्ये प्रत्येक व्यक्तीला दु:खाचा सामना करावा लागतो
दुराचारी, कुदृष्टी व्यक्ती आणि वाईट ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीशी कधीही मैत्री करू नये. असे लोक तुम्हाला केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबालाच अडचणीत टाकतात.

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीति या ग्रंथात जीवनाविषयी अशा गूढ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या एखाद्या व्यक्तीने समजून घेतल्या आणि आपल्या जीवनात आत्मसात केल्या तर त्याला सर्व त्रास टाळता येतील. तसेच, आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांचा अंदाज लावून व्यक्ती त्यांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करु शकते.

आचार्य चाणक्य यांनी आपले संपूर्ण आयुष्य खूप संघर्षात घालवले. पण त्यांनी कधीही परिस्थितीला स्वतःवर वर्चस्व मिळवू दिले नाही. त्यांनी चाणक्य नीतिमध्ये त्यांच्या आजीवन अनुभवाचा उतारा जनहितासाठी लिहिला आहे. चाणक्य नीतिमधील आचार्य चाणक्य यांचे शब्द आजच्या काळातही बऱ्याच अंशी खरे ठरतात. आचार्यांनी आपल्या ग्रंथात अशा तीन परिस्थितींचे वर्णन केले आहे, ज्यात माणसाला अडकल्यास खूप त्रास सहन करावा लागतो.

वृद्धकाले मृता भार्या बन्धुहस्ते गतं धनम्
भोजनं च पराधीनं त्रय: पुंसां विडम्बना:

1. या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की जर एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला तर ती तिच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. पत्नी म्हातारपणी सर्वात मोठा आधार आहे. तिच्या जाण्यामुळे व्यक्तीचे आयुष्य खूप संकटात जाते.

2. आचार्य चाणक्य यांनी पैशाला दुसरी महत्वाची गोष्ट मानली आहे. पैसा ही एक अशी गोष्ट आहे, ज्याच्या मदतीने वाईट काळही सहज निघून जातो. पण जर हा पैसा तुमच्या शत्रूच्या हातात गेला तर ती व्यक्ती उद्ध्वस्त होते. यामुळे केवळ तुमच्या उपजीविकेवरच परिणाम होत नाही, तर तुमचे शत्रू तुमचे पैसे वापरुन तुमचे नुकसान करु शकतात.

3. आचार्य चाणक्य यांच्या मते, तिसरे दुःख म्हणजे माणसाने इतरांवर अवलंबून असणे. एखाद्या व्यक्तीला जितके आयुष्य मिळाले आहे, ते तो स्वयंपूर्ण असेल तरच शांततेत जगू शकतो. इतरांवर अवलंबून राहणे तुम्हाला कमकुवत बनवते. अशा परिस्थितीत व्यक्तीला इतरांच्या अधीन राहावे लागते आणि दुःखाला सामोरे जावे लागते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या या 5 गोष्टी लक्षात ठेवा, कधीही आर्थिक चणचण भासणार नाही

Chanakya Niti | या 3 गोष्टींपासून नेहमी दूर रहा, अन्यथा इतरांच्या निंदेस पात्र ठराल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI