दोन वर्षानंतर देवाची आळंदी भक्तीमय होणार, 4 डिसेंबरपर्यंत यात्रा; यंदा सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा

आळंदी येथील कार्तिकी यात्रा सोहळा 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर (कार्तिक वद्य अष्टमी ते कार्तिक वद्य अमावास्या) या काळात संपन्न होणार आहे.

दोन वर्षानंतर देवाची आळंदी भक्तीमय होणार, 4 डिसेंबरपर्यंत यात्रा; यंदा सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळा
Kartik Sanjeevan Samadhi ceremony

मुंबई : कोरोनाचे संकट कमी झाल्यामुळे यंदा कार्तिकी यात्रा मोठ्या थाटात संपन्न होणार आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्याने मागील वर्षीपेक्षा अधिक मोठ्या स्वरूपात यात्रा व्हावी, अशी मागणी आळंदी देवस्थानने प्रशासनाकडे होती या मागणीचा मान राखत यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रेला सशर्त परवानगी दिली आहे. आळंदी येथील कार्तिकी यात्रा सोहळा 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर (कार्तिक वद्य अष्टमी ते कार्तिक वद्य अमावास्या) या काळात संपन्न होणार आहे.संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 725 व्या संजीवन समाधी दिनानिमित्त मोठ्या दिमाखीत हा सोहळा पार पडणार आहे.

यात्रेचा सुरुवात
या यात्रेची सुरूवात अष्टमी म्हणजेच 27 नव्हेंबर रोजी सकाळी नऊच्या दरम्यान माऊलींच्या समाधी मंदिरासमोरील गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने सुरूवात झाली आहे, अशी माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर यांनी माध्यामांना दिली. त्याप्रमाणे कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या दिंडीकऱ्यांसाठी देवस्थानच्या गायरानात जागा उपलब्ध करण्यात आली आहे.

संजीवन समाधी सोहळा 2 डिसेंबर रोजी
कोरोनाच्या सावटानंतर आता कार्तिकी यात्रा संपन्न होणार आहे. 2 डिसेंबर म्हणजेच कार्तिक वद्य त्रयोदशीला माउलींचा संजीवन समाधी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.सोहळ्याचे यंदा 725  वे वर्ष आहे. कार्तिकी यात्रेसाठी राज्याच्या अनेक भागातून दिंड्या येतात. संत नामदेवांची पायी पालखी , गुलाबराव महाराजांच्या पादुका येतात. पुंडलिकाची दिंडी या सर्वांसोबतच भक्ती भावामध्ये ही यात्रा साजरी होते.

आळंदी यात्रेचे महत्त्व
पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा तीन दिवसांची असते, तर आळंदी येथील यात्रेचा कालावधी आठ दिवसांचा असतो. त्यामुळे येथे भाविकांचा प्रचंड ओघ असतो. भाविकांच्या भक्ती भावामध्ये ही यात्रा साजरी होते.या सोहळ्याचे यंदा 725 वे वर्ष आहे. त्यामुळे सर्व भक्त गण भक्तीत रममाण होणार हे नक्की.

संबंधित बातम्या :

Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील

PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी

Utpanna Ekadashi 2021 | या एकादशीचे महत्त्व आणि पूजा करण्याची पद्धत जाणून घ्या एका क्लिकवर


Published On - 7:30 am, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI