नवरा बायको आयुष्यभराचे जोडीदार असतात. त्यामुळे ते नातं टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट करणं गरजेचं असतं. नात्यात दूरावा आणतील अशा चूक टाळल्या पाहिजेत. अशा चूका टाळल्या पाहिजेत ज्याने नात्यात दूरावा येतो. आचार्य चाणक्य यांनी अशा पाच चुका सांगितल्या आहेत, जे वैवाहिक जीवन बरबाद करू शकतात.
1 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते एखादी स्त्री जर कोणावर प्रेम करत असेल तर इतकं करते की त्याव्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते. जर तुमच्यावर कोणती स्त्री मनापासून प्रेम करते. तुमची काळजी करते तर त्या स्त्रीची साथ कधीच सोडली नाही पाहिजे. भविष्यात जर भांडणं झाली तरी तुम्ही एकमेकांना समजून घेवू शकता. कारण तुमच्यापासून दूर होऊन ही ती कायम तुमची काळजीच करणार
2 / 6
आचार्य चाणक्य याचं म्हणणं आहे की, स्रियांच्या सौदंर्यापेक्षा त्यांच्या गुणांना संस्कारांना जास्त महत्व दिलं पाहिजे. एक गुणवान स्त्री जिथे पण असते, तिथे ती सर्वंच चांगल्या प्रकारे करते. त्यामुळे स्त्रियांच्या सौदंर्यापेक्षा त्यांच्या गुणांना जास्त महत्व द्या.
3 / 6
आचार्य चाणक्य यांच्या मते समाजात स्त्रियांचं शिक्षित असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या एका कुटुंबाचा आधार असतात. एक शिक्षित स्री तिच्या अनेक पिढ्या शिक्षित बनवते आणि कुळाचा उद्धार करते. त्यामुळे स्त्रियांचं शिक्षण खूप गरजेचं आहे.
4 / 6
दुसऱ्यांसमोर गुपित न सांगणं - आचार्य चाणक्य यांच्या मते जर तुम्ही कोणतंही महत्वपूर्ण काम करणार आहात तर ते आधीच सर्वांना सांगु नका. तुम्ही तुमच्या योजनां बद्दल कोणाला सांगु नका. जेव्हा तुमचे काम पूर्ण होईल तेव्हा सर्वांना आपोआप समजेल.
5 / 6
धैर्य - आचार्य चाणक्य यांच्या मते संकट आल्यावर व्यक्तीला घाबरलं नाही पाहिजे. संकटाच्या वेळी कुटुंबातील लोकांना एकत्र ठेवा. जो व्यक्ती कठीण प्रसंगात धैर्य कायम ठेवतो. तो कोणत्याही संकटाला पार करू शकतो.