Marathi News » Spiritual adhyatmik » Chanakya Niti: If you want to succeed in your career, keep in mind the 'these' things said by Acharya Chanakya
Chanakya Niti: करिअरमध्ये यश मिळवायचंय?, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
सिद्धी बोबडे | Edited By: सिद्धेश सावंत
Updated on: May 30, 2022 | 3:42 PM
आचार्य चाणक्यांनी नीतिशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये काही गोष्टी अशा आहेत ज्या करिअरमध्ये यश देतात. जाणून घेऊया यागोष्टी
May 30, 2022 | 3:42 PM
वाईट सवयी असलेल्या, चुकीच्या व्यसनांच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांपासून दूर राहणे तुमच्यासाठी चांगले आहे. अशी लोक तुम्हाला ही चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतात. अशा लोकांच्या संगतीत आल्याने तुमच्या मान संन्मानालाही ठेच पोहचू शकते.
1 / 5
आचार्य सांगतात की, जो गुरू तुमचे भविष्य घडवतो, योग्य-अयोग्य यातील फरक सांगतो, त्याचे स्थान देवापेक्षा मोठे असते. त्याच्या बद्दाल कधीही निंदा करू नये किंवा त्याच्याबद्दल चुकीचे काही ऐकू नये. अशा गुरूचा सदैव आदर करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. ज्यांच्यावर अशा गुरूचा हात असतो, त्यांची करिअरमध्ये खूप प्रगती होते.
2 / 5
तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल, तर तुमचे इरादे मजबूत ठेवा. रोज सकाळी उठून स्वतःला सांगा की तुम्ही हे काम करू शकता. त्यामुळे ते काम करण्याचा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नकारात्मकता दूर होईल.
3 / 5
देवाप्रती तुमच्या मनात जे काही असेल ते कागदावर उतरवा आणि परमेश्वरासमोर वाचा. परमेश्वर तुमचे हृदय वाचतो. परमेश्वरासमोर अशी स्तुती वाचून तुमचा त्याच्याशी थेट संबंध येतो. अशा स्थितीत देव तुमची सर्व बिघडलेली कामं घडवून आणतो. तुमच्या जीवनातील अडथळे दूर करतो. यामुळे तुमचे दुर्दैव सुदैवात बदलते.
4 / 5
आळस - चाणक्य नीतिनुसार आळस हा माणसाचा सर्वात वाईट शत्रू आहे. माणसाने कधीही आळशीपणा करू नये. आळशी लोक आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. त्यामुळे आळशीपणा टाळा.