भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता? तब्बल 90 वर्षांनी आला दुर्मिळ महायोग!
या वर्षी येत्या 9 ऑगस्ट रोजी भारतभरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा काले जातो. या दिवशी देशभरात बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते. हा सण फक्त राखी बांधण्यापुरताच मर्यादित नाही. या सणाला भाऊ-बहिणीच्या प्रमाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.

Raksha Bandhan 2025 : या वर्षी येत्या 9 ऑगस्ट रोजी भारतभरात रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाचा हा सण दरवर्षी श्रावणातील पौर्णिमेच्या तिथीला साजरा काले जातो. या दिवशी देशभरात बहीण आपल्या भावाच्या हाताला राखी बांधते. हा सण फक्त राखी बांधण्यापुरताच मर्यादित नाही. या सणाला भाऊ-बहिणीच्या प्रमाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. दरम्यान या वर्षाच्या रक्षाबंधन सणावर भ्रदाची छाया आहे. असे असले तरी घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण भद्रकला सूर्योदय होण्याआधीच समाप्त होणार असून तब्बल 95 वर्षांनी एक महायोग जुळून आला आहे.
भद्रकाळ नेमका कधी संपणार?
या वर्षी रक्षाबंधनादरम्यान भद्रकाळ येणार आहे. मात्र त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कारण यावेळी भद्रकाळ 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2.12 वाजेपासून ते 9 ऑगस्टच्या दुपारी 1.52 वाजेपर्यंत असेल. त्यामुळे 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवस तुम्हाला रक्षाबंधनाचा उत्सव साजरा करता येईल.
राखी बांदण्याचा शुभ मुहूर्त काय?
ज्योतिषशास्त्रानुसार 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा एक खास शुभ मुहूर्त आहे. हा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरू होईल. त्यानंतर हा शुभ मुहूर्त दुपारी 1 वाजून 20 मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच महिलांना, तरूणींना आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी एकूण 7 तास 50 मिनिटांचा वेळ मिळेल.
रक्षाबंधनासाठी अनेक शुभ मुहूर्त
रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक शुभ मुहूर्त जुळून येत आहेत. या दिवशी शोभन योग 10 ऑगस्ट रोजी रात्री 2 वाजून 15 मिनिटांनी संपेल. त्यानंतर ब्रह्म मुहूर्त सुरू होईल. हा ब्रह्म मुहूर्त 4.22 ते 5:04 मिनिटांपर्यंत असेल. याशिवाय अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 17 मिनिटांपासून ते 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे या काळातही बहीण भावाला राखी बांधू शकते. अशा प्रकारचे सर्व मुहूर्त गेल्या 90 वर्षांतून पहिल्यांदाच येत असल्याचे सांगितले जात आहे.
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.
