श्रावणात चुकूनही करू नयेत ही कामं, जाणून घ्या शास्त्र काय सांगतं?
श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. हा महिना महादेवांना समर्पित आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेव आणि पार्वती मातेची उपासना केली पाहिजे.

श्रावण महिन्याला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावण महिना हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. हा महिना महादेवांना समर्पित आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेव आणि पार्वती मातेची उपासना केली पाहिजे. या महिन्यामध्ये अनेक व्रत आणि उत्सव असतात. शिव पुराणानुसार जर या महिन्यामध्ये तुम्ही महादेव आणि पार्वतीमातेची भक्ती भावाने पूजा केली तर तुमच्या आयुष्यात येणारे सर्व प्रकारचे कष्ट, संकट दूर होतात, तुमची भरभराट होते. महादेव आणि पार्वती मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहातो, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
मात्र असे काही कामं आहेत जे या पवित्र महिन्यात करू नये असं मानलं जातं. हिंदू धर्मशास्त्रानुसार या कामांना श्रावण महिन्यात करण्यास वर्ज्य मानण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशी कोणती कामं आहे, जी श्रावण महिन्यात करू नये असं मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण महिन्यात चातुर्मास असतो. त्यामुळे या महिन्यामध्ये काही काम करणं अशुभ मानलं जातं. या काळात तुम्ही लग्न, विवाह, गृह प्रवेश यासारखे विधी करू शकत नाहीत, त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच अशाप्रकारचे विधी करावेत अशी मान्यता आहे.श्रावण महिना हा धार्मिक महिना असतो, त्यामुळे या काळात नख कापणं, दाढी करणं, कटिंग करणं या सारखे कामं करणं देखील वर्ज मानलं गेलं आहे.
श्रावण महिन्यामध्ये कोणतीही नवीन सुरुवात, जस नवं घर घेणं, फ्लॅटची खरेदी करणं, नवं वाहन खरेदी करणं, एखादा नवा व्यवसाय सुरू करणं, जमीन आणि संपत्तीबाब काही निर्णय घेणं हे देखील काम करू नये, असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. कारण या काळात श्रावण महिना तर असतोच सोबतच चातुर्मास देखील सुरू असतो.
श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे, त्यामुळे या महिन्यात मांस मच्छी, अंडे यांचं सेवन करू नये, असं हिंदू धर्माशास्त्रामध्ये सांगितलं आहे. तसेच या काळात कांदा, लसून या सारख्या तोमोगुणी पदार्थाचं सेवन देखील करू नये, असंही शास्त्र सांगतं
