Vastu Tips : जर तुम्हीही बाथरूममध्ये ठेवल्या असतील या तीन गोष्टी, तर घरात कधीच पैसा टिकणार नाही
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व आहे, तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या नसाव्यात? वस्तुंची दिशा कोणती असावी? अशा अनेक विषयांवर वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

वास्तुशास्त्राला हिंदू धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रामध्ये अनन्यसाधाराण महत्त्व आहे. तुमचं घर कसं असावं? या संदर्भात वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमचं घर कोणत्या दिशेला असावं? घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? जर घराचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर काय होतं? घराचा दरवाजा नेहमी पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच का असावा? तुमच्या बेडरूमची दिशा कोणती असावी? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? अशा एकना अनेक गोष्टींचं मार्गदर्शन वास्तुशास्त्र आपल्याला करतं.
दरम्यान वास्तुशास्त्र फक्त घरासंदर्भातच मार्गदर्शन करत नाही, तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या घरात ठेवल्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या घरामध्ये ठेवल्यामुळे काय परिणाम होऊ शकतात? याचं मार्गदर्शन देखील वास्तुशास्त्रामध्ये करण्यात आलं आहे. आपल्या घरात अशा काही वस्तू असतात त्यामुळे तुमच्या जीवनात प्रचंड नकारात्मकता येऊ शकते त्याची माहिती देखील वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात असलेलं बाथरूम हे असं स्थान आहे की त्या ठिकाणी प्रचंड नकारात्मक शक्ती असते, तिचा परिणाम तुमच्यावर होत असतो. त्यातच तुम्ही काही विशिष्ट गोष्टी या बाथरूममध्ये ठेवल्यास नकारात्मक शक्ती दुप्पट वाढते, ज्यामुळे तुमच्यावर आर्थिक संकटांसोबतच इतरही काही संकटं येऊ शकतात. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
वास्तुशास्त्रानुसार घरात कधीच मोकीळ बकेट ठेवू नये, कारण मोकळी बकेट देखील नकारात्मक ऊर्जेचं प्रतिक मानलं जातं. बाथरूममधील बकेट नेहमी भरलेल्या असाव्यात असं वास्तुशास्त्र सांगतं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाथरूमध्ये कधीच फुटलेला आरसा नसावा, फुटलेल्या आरशात स्वत:ला पाहणं अशुभ मानलं गेलं आहे. यामुळे घरात नाकरात्मक ऊर्जा येते. सोबतच बाथरूमध्ये कोणत्याही प्रकारची झाडं किंवा रोपं नसावीत असं देखील वास्तुशास्त्र सांगतं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
