AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : बेडरूममध्ये या प्रतिमा लावणं असतं खूपच शुभ, वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार घरात बेडरूम ही खूप महत्त्वाची असते, कारण बेडरूम ही तुमच्या आराम आणि मानसिक शांतीचं केंद्र असते, बेडरूममध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असावी असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे, कारण बेडरूममधील ऊर्जेचा परिणाम हा पती-पत्नीच्या आयुष्यावर सर्वाधिक होत असतो.

Vastu Tips : बेडरूममध्ये या प्रतिमा लावणं असतं खूपच शुभ, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2025 | 9:24 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार घरात बेडरूम ही खूप महत्त्वाची असते, कारण बेडरूम ही तुमच्या आराम आणि मानसिक शांतीचं केंद्र असते, बेडरूममध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा असावी असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे, कारण बेडरूममधील ऊर्जेचा परिणाम हा पती-पत्नीच्या आयुष्यावर सर्वाधिक होत असतो, जर बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर त्यामुळे पती-पत्नीच्या नात्यामध्ये तणाव निर्माण होतो. कारण नसतानाही अनेकदा वाद होतात. घर अस्थिर बनते, घरात शांती राहत नाही.

त्यामुळे तुम्ही बेडरूममध्ये ज्या वस्तू ठेवतात किंवा धार्मिक प्रतिमा लावतात त्या विचारपूर्वक लावल्या पाहिजेत असं वास्तुशास्त्र सांगतं. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये ज्या देवी, देवतांच्या प्रतिमा लावतात त्याचा प्रभाव हा नकळतपणे तुमच्या आयुष्यावर पडत असतो, अशा काही प्रतिमा असतात, ज्या तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावल्या तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, त्यामुळे बेडरूममध्ये कोणत्या प्रतिमा लावाव्यात आणि कोणत्या लावू नयेत? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.

राधा-कृष्ण यांची प्रतिमा – वास्तुशास्त्रानुसार राधा-कृष्ण यांची जोडी प्रेम आणि सामंजस्य यांचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे बेडरूममध्ये राधा-कृष्ण यांची प्रतिमा लावल्यास दाम्पत्य जीवनात प्रेम आणि सूख-शांती राहाते, मात्र राधा कृष्ण यांची प्रतिमा बेडरूममध्ये लावताना एक गोष्ट लक्षात घ्या बेडरूममध्ये केवळ कृष्ण किंवा राधा यांची एकटी प्रतिमा लावू नका, त्यामुळे घरात तणाव निर्माण होतो, त्यामुळे प्रतिमा लावताना दोघांची एकत्र असलेलीच प्रतिमा लावावी.

महादेव पार्वती मातेची प्रतिमा – बेडरूममध्ये महादेव आणि पार्वती मातेची प्रतिमा लावणं देखील शुभ मानलं जातं, कारण ही प्रतिमा विश्वास आणि स्थिरतेचं प्रतिक आहे. त्यामुळे घरात वादविवाद होत नाहीत. महादेव पार्वतीची मूर्ती घराच्या उत्तर-पूर्व दिशेला लावावी.

हनुमानाची प्रतिमा बेडरूममध्ये लावू नये- वास्तुशास्त्रानुसार हनुमानाची प्रतिमा ही बेडरूममध्ये लावू नये, हनुमानाची प्रतिमा ही घराच्या हॉलमध्ये लावावी, यामुळे तुमच्यावर येणारे सर्व प्रकारचे संकट दूर होतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.