Vastu Tips : चुकूनही कोणाकडून मोफत घेऊ नका या चार वस्तू, नाहीतर घरात गरिबी आलीच म्हणून समजा
वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या चुकूनही इतरांकडून कधीच मोफत घेऊ नयेत, या वस्तूंचा संबंध हा पैशांशी असतो, कोणत्या आहेत त्या वस्तू? त्याबद्दल जाणून घेऊयात.

वास्तुशास्त्र हे तुमच्या घराशी संबंधित शास्त्र आहे, तुमचं घर नेमकं कसं असावं? घराची आदर्श रचना कशी असावी? घर कोणत्या दिशेला असावं? कोणती दिशा शुभ असते? कोणती दिशा अशुभ असते? याबाबत वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे. वास्तुशास्त्राला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वास्तुशास्त्रामध्ये केवळ वास्तुविचारच सांगण्यात आलेले नाहीत तर इतर अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जसं की घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येण्याची कारणं काय आहेत? त्यावर आपण काय उपाय करू शकतो? घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या नसाव्यात? कोणती झाडं शुभ आहेत? कोणती अशुभ आहेत? अशा अनेक गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आल्या आहेत.
दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी देखील सांगण्यात आल्या आहेत? ज्याचा सबंध थेट पैशांशी आहे. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या वस्तू तुम्ही इतरांकडून कधीही मोफत घेता काम नये, त्याचा योग्य तो मोबदला देऊनच त्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे, त्या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत? आणि वास्तुशास्त्रा नेमकं काय म्हणतं याबाबत आपण जाणून घेऊयात.
रुमाल – वास्तुशास्त्र सांगतं की रुमाला आश्रूंचं आणि दु:खांचं प्रतिक मानलं जातं, तुम्ही जेव्हा इतरांकडून मोफत कोणताही मोबदला न घेता रुमाल घेता तेव्हा त्याचं दु:ख ये तुमच्याकडे येतं. त्यामुळे कधीही रुमाल हा मोफत घेऊ नये, किंवा तो इतरांना गिफ्ट म्हणून सुद्धा देऊ नये, योग्य मोबदला देऊनच रुमाल खरेदी केला पाहिजे.
मीठ – मीठाचा संबंध हा शनि देवांशी आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या ठिकाणावरून तुमच्या घरी मीठ आणता तेव्हा ते मोफत आणू नका, त्याचा मोबदला देऊनच ते खरेदी करा.
सुई – सुईचा उपयोग हा कपडे शिवण्यासाठी होतो, मात्र कधीही कोणाकडून सुई मोफत खरेदी करू नका. त्यामुळे तुमच्या घरात गरिबी येण्याची शक्यता असते, असं वास्तुशास्त्र सांगतं.
कात – काताचा वापर हा विड्याच्या पानामध्ये होतो, मात्र कात देखील कोणाकडूनही कधीच मोफत घेऊ नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
