अत्यंयात्रेवेळी मृतदेहाच्या मागे पैसे का उधळले जातात? खरं कारण तुम्हालाही माहिती नसेल
मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे. मरण आजपर्यंत कोणालाही चुकलेलं नाही. पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा कधीना कधी मरणारच आहे.

मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे. मरण आजपर्यंत कोणालाही चुकलेलं नाही. पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा कधीना कधी मरणारच आहे. मात्र प्रत्येकाला मरणाची एक प्रकारे भीती वाटत असते. प्रत्येक धर्मामध्ये अंत्यसंस्काराच्या विविध पद्धती, प्रथा आहेत. हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले जातात. हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याची अंत्ययात्रा काढली जाते. त्यानंतर त्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन अग्नी दिला जातो. तुम्ही अनेकदा पाहायलं असेल की अंत्ययात्रा सुरू असताना मृतदेहाच्या मागे पैसे उधळले जातात. पण असं का केलं जात याचा विचार कधी तुम्ही केला आहे का? जाणून घेऊयात त्या मागचं कारण.
मनुष्य आयुष्यभर पैशांच्या मागे पळत असतो. जन्माला आल्यानंतर तो जसजसा मोठा होतो, तस तसा त्याच्या स्वप्नाचा विस्तार होतो. घर, गाडी, बंगला या गोष्टी त्याला हव्या असतात. त्यासाठी तो आयुष्यभर पैसे कमावतो. कधी-कधी चुकीच्या मार्गानं देखील पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो. आपल्यापाठी मागे आपली पुढील पिढी सुखी राहावी अशी त्यांची इच्छा असते. त्यासाठी तो प्रत्येक मार्गानं पैसे कमावतो. मात्र जेव्हा त्याचा मृत्यू होतो. तेव्हा तो सर्व वस्तू इथेच ठेवून जातो. तो आपल्यासोबत एकही रुपया घेऊन जाऊ शकत नाही.
जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो. तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेवेळी पैसे उधळले जातात. कारण त्यातून असा संदेश दिला जातो की, तुम्ही आयुष्यभर पैशांच्या मागे कितीही धावपळ करा. मात्र सोबत तुम्ही काहीही घेऊन जाऊ शकत नाही. एक रुपया देखील घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे हयात असतानाच दान धर्म करा. गरजुंची मदत करा. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने अंत्ययात्रेवेळी पैसे उधळता, तेव्हा मृत आत्म्याला शांती लाभते असा देखील त्यामागचा एक समज आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
