IPL 2026 Mumbai Indians : ‘हार्दिक पंड्या तू कॅप्टनशिप सोड आणि नेतृत्व..’ मुंबई इंडियन्सची स्थिती पाहून कोणी केली कळकळीची विनंती?
IPL 2026 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सची टीम या सीजनमध्ये खराब परफॉर्मन्स करत आहे. सलग चार सामने त्यांनी गमावले आहेत. मुंबई इंडियन्सच्या या अवस्थेसाठी कॅप्टन हार्दिक पंड्याला जबाबदार धरण्यात येत आहे. आतापर्यंत सलग चार सामने गमावले आहेत.

आयपीएल 2026 टुर्नामेंटला सुरुवात झाल्यापासून मुंबई इंडियन्सला आतापर्यंत फक्त एक सामना जिंकता आलाय. सलग चार सामन्यात टीमचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्यावर रडारवर आला आहे. त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई इंडियन्स शेवटून दुसर्या स्थानावर आहे. गुरुवारी पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा घरच्या मैदानावर श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सने दारुण पराभव केला. मुंबई इंडियन्सची टीम ही दिग्गज क्रिकेटपटूंनी भरलेली आहे. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे चारही प्लेयर नेहमीच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असतात. पण सध्या या चौघांचाही सूर हरवला आहे. त्याचा फटका मुंबई इंडियन्सला सहन कराव लागतोय. एवढी चांगली टीम असूनही क्लिक होत नाहीय.
पंजाब किंग्सकडून पराभव झाल्यानंतर भारताच माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने क्रिकबझशी बोलताना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर टीकेचे आसूड ओढले आहेत. हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्सचा चार्ज घेतल्यापासून त्याच्या नेतृत्वगुणात घसरण झालीय असं मनोज तिवारीला वाटतं. “जबाबदारीची भावना कुठून येणार? माणसाने स्वत:ला सुद्धा पाहिलं पाहिजे. तुम्ही हे पाहिलं पाहिजे की तुम्ही कसे खेळताय?. मला असं वाटतं की, या वर्षी तुम्हाला यश मिळत नाहीय, म्हणून चुका फक्त याचवर्षी झालेल्या नाहीत. त्याच्या मूळ कारणांचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. 2015 ते 2023 मध्ये रोहित शर्माने अनेक ट्रॉफी जिंकून देण्यात मदत केली” असं मनोज तिवारी म्हणाला.
‘मला वाटतं हार्दिकने कॅप्टनशिप सोडावी’
“मनोज तिवारीने हार्दिक पंड्याला कॅप्टनशिपसोडून रोहित शर्माकडे सोपवण्याची विनंती केली. त्याने 2013 ते 2023 दरम्यान पाचवेळा टीमला विजेतेपद मिळवून दिलं आहे. 2023 मध्ये ट्रॉफी जिंकली नाही. 2024 मध्ये ट्रॉफी नाही. आता यावर्षी सुद्धा असच होण्याची शक्यता आहे. मला वाटतं की, कॅप्टनशिप कमकुवत आहे. मला जास्त कठोर व्हायचं नाही. हार्दिक टीमचं नेतृत्व तसं करत नाहीय, जसं केलं पाहिजे. एक कॅप्टन म्हणून सक्रीय राहणं खूप आवश्यक आहे. मला वाटतं हार्दिकने कॅप्टनशिप सोडावी, पुन्हा रोहितकडे नेतृत्व द्यावं. रोहितला हटवताना तुम्ही अन्याय केलेला” असं मनोज तिवारी म्हणाला.
