Photo : 21 वर्षीय खेळाडूने तासाभरात बनवले 4 वर्ल्ड रेकॉर्ड, खेळाच्या इतिहासातील ‘ती जादूई 45 मिनिटं’

वर्ल्ड रेकॉर्डतर दरवर्षी बनत असतात, पण एकाच दिवसांत अवघ्या 45 मिनिटांत चार वर्ल्ड रेकॉर्डे तेही एकाच खेळाडूकडून म्हणजे जादूच म्हणावी लागेल.

1/7
ss
खेळाच्या इतिहासांत एका धावपटूने केलेली जादूई कामगिरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एखादं वर्ल्ड रेकॉर्ड करायला अपार मेहनत घ्यावी लागते. अनेक वर्ष लोटतात. पण एका अमेरिकन धावपटूने एक नाही तर 4 वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी 45 आठवडे किंवा 45 दिवस नाही तर केवळ 45 मिनटं घेतली. दुपारी 3 वाजून 15 मिनीटांपासून दुपारी 4 वाजेपर्यंत त्याने ही अद्भुत कामगिरी केली. जेसी ओवेन्स असे या महान खेळाडूचे नाव असून त्यांनी आपल्या रेकॉर्ड्सवर एक पुस्तक ही लिहिलं आहे. 'खेळाच्या इतिहासातील सर्वांत जादूई 45 मिनट' (the greatest 45 minutes ever in sport) असं या पुस्तकाचं नाव आहे.
2/7
ownes
गोष्ट आहे 1935 च्या बिग टेन ट्रॅक एंड फील्ड चॅम्पियनशिपची (1935 Big Ten Track and Field Championships in Ann Arbor). या स्पर्धेत 21 वर्षीय अमेरिकन धावपटू जेसी ओवेन्स यांनी सर्वांत आधी 100 यार्ड डॅश स्पर्धेत, त्यानंतर लांब उडीत, नंतर 220 यार्ड डॅश स्पर्धा आणि अखेर 220 लो हर्डल शर्यतीत हे वर्ल्ड रेकॉर्ड बनवले.
3/7
jesse
या सर्व रेकॉर्डमध्ये एक खास गोष्ट म्हणजे हे सर्व रेकॉर्ड करताना ओवेन्स यांना पाठीची दुखापत होती. त्यावर मात करत ओवेन्स यांनी ही अद्भुत कामगिरी केली होती.
4/7
jess
सर्वांत आधी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी 100 यार्ड डॅश स्पर्धा झाली. ज्यात सुरुवातीचे 30 यार्ड पार होताच ओवेन्स यांनी कमालीची स्पिड घेतली. त्यांनी अवघ्या 9.4 सेकंदात शर्यत पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली.
5/7
long jump
त्यानंतर लगेचच 3 वाजून 25 मिनिटांनी लांब उडी स्पर्धेत ओवेन्स यांनी अर्ध्या फुटाहून अधिकच्या फरकाने नवं वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन केलं. त्यांनी सुमारे 26 फुट साडे 8 इंच इतकी लांबउडी मारली होती. आजही हा रेकॉर्ड सातव्या क्रमांकावर आहे.
6/7
220 race
दोन वर्ल्ड रेकॉर्ड केल्यानंतर दुपारी 3 वाजून 34 मिनिटांनी 220 यार्ड डॅश शर्यतीत ओवेन्स यांनी तिसरा रेकॉर्ड बनवला. संपूर्ण शर्यत 20.3 सेकंदात पार करत 20.6 सेकंदाचा जुना रेकॉर्ड ओवेन्स यांनी तोडला
7/7
hurdle
अखेर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास 220 लो हर्डल स्पर्धा ओवेन्स यांनी 22.6 सेंकंदात पूर्ण करत 23 सेकंदाचे जुने रेकॉर्ड तोडले.