Anaya Banagr : आधी होता मुलगा, आता झाली मुलगी… अनाया बांगरला मोठा झटका, ट्रान्सजेंडर विरोधात…
भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनन्या बांगरने क्रिकेट बोर्डाच्या एका मोठ्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवला आहे. दोन वर्षांपूर्वी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतलेली ही मुलगा म्हणून जन्माला आली होती, नंतर ती मुलगी बनली. तिने तिचे नाव बदलून अनाया असे ठेवले.

माजी भारतीय क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनन्या बांगर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. संजय बांगर यांची मुलगी अनया आधी मुलगा होती पण आता तिने तिचे जेंडर बदलले आहे. ती आधी मुलगा होती, पण आता मुलगी बनली आहे. दोन वर्षांपूर्वी तिने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतली. त्यानंतर ती बराच काळ लंडनमध्ये राहिली. अनन्या बांगरने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने ट्रान्सजेंडर्ससाठी आवाज उठवला आहे. खरंतर, एका क्रिकेट बोर्डाने अलीकडेच ट्रान्सजेंडर्सविरुद्ध एक मोठा निर्णय घेतला आहे.
ट्रान्सजेंडरविरुद्धच्या या निर्णयावर अनया बांगर संतापली
खरंतर, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) एक मोठा निर्णय घेतला आहे. ईसीबीने ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला आणि मुलींच्या सामन्यांमध्ये भाग घेण्यास बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अलिकडच्या निर्णयात, महिलांच्या कायदेशीर व्याख्येतून ट्रान्सजेंडरना वगळण्यात आले आहे. त्यानंतर ईसीबीने निवेदन जारी केले.त्यात असे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानंतर अद्ययावत कायदेशीर स्थितीनंतर ते ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या पात्रतेवरील त्यांच्या नियमांमध्ये बदल जाहीर करत आहेत. ‘तात्काळ प्रभावाने, ज्या खेळाडूंचे जैविक लिंग महिला आहे तेच महिला क्रिकेट आणि मुलींच्या क्रिकेट सामन्यांमध्ये खेळण्यास पात्र असतील. असेही ईसीबीच्या निवेदनात नमूद करण्यात आलं. ट्रान्सजेंडर महिला आणि मुली खुल्या आणि मिश्र क्रिकेट खेळू शकतात’. मात्र, ईसीबीच्या या निर्णयाविरुद्ध अनन्या बांगरने सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
अनाया बांगरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ‘ आज इंग्लंडमधील बातम्या पाहणाऱ्या प्रत्येकासाठी… ईसीबीने ट्रान्स महिलांना केवळ व्यावसायिक क्रिकेटमध्येच नव्हे तर खेळाच्या मनोरंजनात्मक आणि तळागाळातील पातळीवरही सहभागी होण्यास अधिकृतपणे बंदी घातली आहे. हा फक्त एक नियम नाही. तर हा एक संदेश आहे. असा मेसेज, जो सांगतो की, तुमचे समर्पण, प्रतिभा, शिस्त किंवा परिवर्तन झाले तरीही, तुम्हाला पुरेसे चांगले म्हणून पाहिले जाणार नाही. या खेळाला आपले मन समर्पित केलेल्या व्यक्ती म्हणून, ते वैयक्तिक वाटते. मी फक्त ट्रान्स गर्ल नाहीये, तर मी एक क्रिकेटपटू देखील आहे. याच खेळात मला भेदभाव, छळ आणि अदृश्यतेचा सामना करावा लागला आहे. आणि आता, संस्था आपले अस्तित्व पूर्णपणे पुसून टाकणाऱ्या रेषा आखत आहेत. ते खेळपट्टीवर नियंत्रण ठेवू शकतात, पण ते आपल्या भावनांवर कधीही नियंत्रण ठेवू शकत नाहीत. हा आमच्या डावाचा शेवट नाही.’ अशा शब्दांत अनायाने तिचा राग व्यक्त केला.
View this post on Instagram
ICC नेही घेतला मोठा निर्णय
यापूर्वी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) देखील ट्रान्सजेंडर खेळाडूंना आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये भाग घेण्यास बंदी घातली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने देशांच्या स्थानिक क्रिकेटमध्ये हा नियम लागू केलेला नाही. जर बोर्डाला हवे असेल तर ते त्यांच्या देशातील स्थानिक महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंचा समावेश करू शकतात. परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने स्थानिक महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे.
