‘बीसीसीआय’कडून राहुल द्रविडला क्लीन चीट

टीम इंडियामध्ये जेंटलमन म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) याला बीसीसीआय (BCCI) ने हितसंबंधांच्या मुद्यावरुन (Conflict of Interest) नोटीस बजावली होती.

'बीसीसीआय'कडून राहुल द्रविडला क्लीन चीट

मुंबई : टीम इंडियामध्ये जेंटलमन म्हणून ओळखला जाणारा माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) याला बीसीसीआय (BCCI) ने हितसंबंधांच्या मुद्यावरुन (Conflict of Interest) नोटीस बजावली होती. या प्रकरणी अखेर द्रविडला क्लीन चीट देण्यात आली आहे. बीसीसीआयचे अधिकारी न्यायमूर्ती (निवृत्त) डी. के. जैन यांनी द्रविडला क्लीन चीट दिली.

न्यायमूर्ती जैन यांच्यानुसार, त्यांना माजी भारतीय कर्णधाराविरोधातील आरोपांमध्ये कुठलंही तथ्य आढळलं नाही. द्रविडची 12 नोव्हेंबरला जैन यांच्यासमोर हजेरी होती. त्यानंतर जैन यांनी हा निर्णय सुनावला.

काय आहे प्रकरण?

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि नॅशनल क्रिकेट अकादमीचा (एनसीए) क्रिकेट संचलन प्रमुख राहुल द्रविडला बीसीसीआयने हितसंबंधांच्या मुद्यावरुन नोटीस बजावली होती. मध्य प्रदेश क्रिकेट संघाचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीवरुन बीसीसीआयचे अधिकारी (निवृत्त) जस्टीस डी. के. जैन यांनी ही नोटीस पाठवली होती.

राहुल द्रविड एनसीएचा संचलन प्रमुख असून इंडिया सिमेंट ग्रुपचाही उपाध्यक्ष आहे. इंडिया सिमेंटकडे आयपीएल फ्रँचायजी चेन्नई सुपरकिंग्जचे अधिकार आहेत. द्रविड दोन्ही संस्थांमध्ये कार्यरत असल्याने हितसंबंधाच्या मुद्याचं हे उल्लंघन आहे, असा आरोप गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत केला होता. मात्र, आता या प्रकरणी राहुल द्रविडला क्लीन चीट देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडवर सर्वात मोठी जबाबदारी

श्रीसंतने राहुल द्रविडला शिवी दिली होती : माजी प्रशिक्षक पॅडी अप्टन

पंड्या-राहुल वादावर जेंटलमन द्रविडची प्रतिक्रिया

देवच आता भारतीय क्रिकेटचा तारणहार, द्रविडला BCCI च्या नोटिसीवरुन ‘दादा’ भडकला

Published On - 8:42 am, Fri, 15 November 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI