BCCI | "अमित शाह भारतीय क्रिकेट चालवतायेत, गांगुली पैशांचा भुकेला"

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे.

BCCI | "अमित शाह भारतीय क्रिकेट चालवतायेत, गांगुली पैशांचा भुकेला"

मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि क्रिकेट प्रशासक समितीचे माजी सदस्य रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (BCCI) गंभीर आरोप केले आहेत. ‘द कॉमनवेल्थ ऑफ क्रिकेटः अ लाइफलोन्ग लव्ह अफेयर विथ मोस्ट सस्टेन्ड अँड सोफिस्टीटेड गेम नॉन टू ह्यूमनकाइव्ह’ या त्यांच्या पुस्तकामध्ये प्रशासनातल्या कामकाजावर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर बीसीसीआयशी संबंधित बर्‍याच गोष्टींबाबत खुलासा केला आहे. विद्यमान गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन (N Srinivasan) हे दोघेच भारतीय क्रिकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप गुहा यांनी केला आहे. मिड डेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गुहा यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. bcci ramchandra guha criticism of amit shah and sourav ganguly

गुहा काय म्हणाले?

“एन. श्रीनिवासन आणि अमित शहाच भारतीय क्रिकेट चालवतायेत, असा दावा गुहांनी केलाय. तसेच राज्य क्रिकेट बोर्डाचा कारभार एखाद्याची मुलगी किंवा मुलाद्वारे चालवलं जात आहे. बीसीसीआय पूर्णपणे षड्यंत्र आणि नातेसंबंधात बुडाली आहे. रणजी खेळाडूंना त्यांचे मानधन मिळण्यास विलंब होतोय. बोर्डाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र असं काहीही झालेलं नाहीये”, असंही गुहा म्हणाले.

“गांगुली पैशांचा भुकेला”

गुहा यांनी बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीवर घणाघाती टीका केली आहे. गांगुली अध्यक्ष असताना फॅंटसी गेमची जाहिरात केली. यावरुन गुहांनी टीका केली. “गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये पैशांसाठी असलेली भूक ही आश्चर्यकारक आहे. माझ्या पुस्तकात माजी क्रिकेटपटू बिशनसिंह बेदी यांची कथा आहे. ती कथा सर्वोत्तम आहे. या कथेत बिशनसिंह म्हणातात की, मला अफगाणिस्तानच्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी काबूलला जाण्यासाठी मी आनंदी आहे. तो क्रिकेटसाठी कुठेही जाऊ शकतो मात्र पैशांसाठी नाही”, असं म्हटलंय. गांगुली थोड्या पैशांसाठी त्तवांशी तडजोड का करतोय, असा प्रश्नही गुहांनी व्यक्त केला.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2017 मध्ये बीसीसीआयचं कामकाज हाताळण्यासाठी प्रशासकांची समिती नेमली. बीसीसीआयच्या कामात पारदर्शकता ठेवणं हे या समितीचं महत्वाचं कार्य. ही 5 सदस्यीय समिती होती. मात्र गुहा यांनी जून 2017 मध्ये काढता पाय घेतला. वैयक्तिक कारणांमुळे गुहा यांनी प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांच्याकडे राजीनाम सूपूर्द केला होता.

संबंधित बातम्या :

बीसीसीआयच्या निवड समिती अध्यक्षपदाच्या रेसमध्ये अजित आगरकर सर्वात पुढे

bcci ramchandra guha criticism of amit shah and sourav ganguly

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *