इंग्लंड सरकारच्या निर्णयाने विराटसेनेच्या ‘आनंद पोटात माईना…!’

इंग्लंडला टेक-ऑफ करण्यासाठी तयार असलेल्या भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय खेळाडूंना आपल्या पत्नीला त्यांच्यासोबत इंग्लंडला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. (before india tour of England UK Government Big Decision)

इंग्लंड सरकारच्या निर्णयाने विराटसेनेच्या 'आनंद पोटात माईना...!'
भारताचा इंग्लंड दौरा...
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 12:05 PM

मुंबई : इंग्लंडला टेक-ऑफ करण्यासाठी तयार असलेल्या भारतीय संघासाठी (team india) एक आनंदाची बातमी आहे (India tour of England). युके सरकारने अर्थात इंग्लंड सरकारनं एक मोठं पाऊल उचललं आहे. इंग्लंड सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे भारतीय खेळाडूंना आपल्या पत्नीला त्यांच्यासोबत इंग्लंडला घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर फुलली असेल. या दौऱ्यात भारतीय संघाचे खेळाडू जवळपास साडेतीन ते चार महिने इंग्लंडला राहणार आहेत. भारताच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी दोन हात करेल. तर नंतर लगोलग इंग्लंड विरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. दुसरीकडे भारताचा महिला संघ एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामने खेळेल. (before india tour of England UK Government take A Big Decision)

कोरोना संसर्गामुळे घालून दिलेल्या नियम आणि अटींच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे सगळे खेळाडू सध्या मुंबईमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहेत. पुरुष आणि महिला संघ आपल्या परिवारासोबत दोन जूनला इंग्लंडसाठी प्रयाण करतील. 3 जून रोजी ते लंडन येथे पोहोचतील. दोन्ही संघ पहिल्यांदा साऊथहॅम्प्टन येथे उतरतील. तिथं खेळाडू आणि त्यांचा परिवार पुन्हा एकदा क्वारंटाईन होईल. त्यानंतर क्वारंटाईन पिरियड पूर्ण झाल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखालील संघ साउथहॅम्प्टन येथेच राहणार आहे. 18 ते 22 जून दरम्यान साऊथहॅम्प्टनच्या ग्राऊंडवर भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. तर महिला संघ साउथम्पटन इथून ब्रिस्टलला रवाना होईल.

भारताचा इंग्लंड दौरा

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मुंबईत क्वारंन्टाईन आहे. 14 दिवसांपासून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 सदस्यीय भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडसाठी प्रयान करेल. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका भारताला इंग्लंड दौऱ्यात खेळायची आहे. त्याअगोदर मुंबईत भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

(before india tour of England UK Government take A Big Decision)

हे ही वाचा :

भल्याभल्यांना जमली नाही ती कामगिरी जेम्स अँडरसन करणार, सचिन तेंडुलकरचा ‘तो’ रेकॉर्ड तोडणार?

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

India tour of England : भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर माजी कर्णधाराचा आक्षेप, सामन्यांच्या नियोजनावर वर्तविली नाराजी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.