AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्राण जाये पर वचन न जाये ! मराठमोळ्या क्रिकेटवेड्याने शब्द पाळला, पैज हरल्याने अर्धी मिशी काढली!

या क्रिकेटवेड्याने एक पैज लावली. मात्र ही पैज हारल्याने या पठ्ठ्याने आपली अर्धी मिशी उडवली.

प्राण जाये पर वचन न जाये ! मराठमोळ्या क्रिकेटवेड्याने शब्द पाळला, पैज हरल्याने अर्धी मिशी काढली!
पैज हरल्याने मिशी काढली.
| Updated on: Jan 08, 2021 | 7:37 PM
Share

मुंबई : मिशी, पुरुषांची आन बाण शान. अनेक पुरुषांना आपल्या मिशीचा (mustache) गर्व असतो. अनेक जण तावातावात म्हणतातही की, मी शब्द नाही पाळला तर मिशी काढून देईन. मात्र सर्वच दिलेला शब्द पाळतातच असं नाही. मात्र एका पठ्ठ्याने आपला दिलेला शब्द पाळलाय. त्यानुसार आपली अर्धी मिशीही काढली. पुरावा म्हणून त्याने अर्धी मिशीसह तो फोटो ट्विटरवर शेअरही केला. (Cricket fans lost half a mustache after losing a bet on Rohit Sharma)

नक्की प्रकरण काय?

क्रिकेटलाच आपला श्वास समजणारे अनेक क्रिकेटप्रेमी आपल्याकडे आहेत. सध्या भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. दुखापतीनंतर रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यातून पुनरागमन केलं. तिसऱ्या कसोटी आधी रोहितसाठी कोणत्या खेळाडूला डच्चू देण्यात यावा, असा प्रश्न @thenileshkolage या ट्विटर हॅंडलवरुन विचारण्यात आला. यावर @Ajay81592669 या ट्विटर युजरने प्रतिक्रिया दिली.

“रोहित जर कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम् पुरुष आहे. रोहितने ब्रॉड आणि अँडरसनचं प्रत्येकी एक ओव्हर खेळून दाखवावी. ते जाऊ दे. रोहितने किमान स्टार्क, हेझलवुड आणि पॅट कमिन्स या गोलंदाजांच्या एकूण मिळून तीस चेंडू खेळून काढू दे. रोहितने या गोलंदाजांच्या 30 चेंडूंचा सामना केला तर, मी अर्धी मिशी काढून टाकेन, अशी प्रतिक्रिया @thenileshkolage च्या ट्विवर दिली.

दरम्यान रोहित शर्माने तिसऱ्या सामन्यात शानदार पुनरागमन केलं. त्याने पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क या गोलंदाजांच्या भेदक माऱ्याचा सामना केला. रोहितने 77 चेंडूत 3 चौकार आणि 1 सिक्ससह 26 धावांची खेळी केली. या @Ajay81592669 पठ्ठ्यानुसार रोहितने अगदी सहजपणे या तिन्ही गोलंदाजांचा सामना केला. त्यामुळे आता वेळ होती @Ajay81592669 या ट्विटर युझरची दिलेल्या शब्दानुसार मिशी काढायची. या पठ्ठ्याने आपला शब्द मागे घेतला नाही. तसेच कोणती पळवाटही काढली नाही. @Ajay81592669 आपल्या शब्दाला जागला. भावाने आपल्या शब्दाखातर चक्क अर्ध मिशी कापली. @Ajay81592669 हा भाऊ इथवरच थांबला नाही. त्याने पुरावा म्हणून अर्ध मिशीसह सेल्फी काढला. हा सेल्फी त्याने ट्विटरवर शेअरही केला.

“मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा अभिमान”

ट्विटर अर्धमिशीसह फोटो ट्विट करताना या भाऊने खंत व्यक्त केली. “बऱ्याच जणांनी मी अर्धी मिशी काढल्याबद्दल मला नावं ठेवली. पण मला माझ्या क्रिकेटवेडेपणाचा खूप अभिमान होता आणि आहे. तरी देखील मी सिडनी डोळ्यासमोर असताना पैज लावण्याची चूक केली. म्हणून खूप विचारांतीच मी अर्धश्मश्रूमुंडन केलंय” अशा शब्दात या भाऊने आपली भावना व्यक्त केली.

ट्विटरवर कौतुक

अनेक जण शब्द देतात. पण शब्दाला जागत नाही. मात्र या भाऊने आपला शब्द पाळला. यामुळे या भाऊंचं ट्विटरवर कौतुक केलं जात आहे.

रोहितची विक्रमी कामगिरी

रोहित शर्माने 26 धावांची खेळी केली. या खेळीत 1 सिक्सचाही समावेश होता. या सिक्ससह रोहितने ऑस्ट्रेलियाविरोधात 100 सिक्स पूर्ण केले. यासह रोहित ऑस्ट्रेलियाविरोधात 100 सिक्स मारणारा पहिला फंलदाज ठरला.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind 3rd Test | जोरदार कमबॅक दमदार रेकॉर्ड, हिटमॅन रोहित शर्माची विक्रमी कामगिरी

मिशी नाही, तर काहीच नाही; मिशी असून मुलं नाही, पुण्यात आजी-माजी आमदारांची जुंपली

(Cricket fans lost half a mustache after losing a bet on Rohit Sharma)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.