AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AFG vs IND Highlights And Score: टीम इंडियाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल, अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला धुव्वा

| Updated on: Jun 21, 2024 | 12:27 AM
Share

AFG vs IND, T20 world Cup 2024 Highlights And Score In Marathi: रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडियाने सुपर 8 मोहिमेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाच्या या विजयात सर्वच खेळाडूंचं योगदान राहिलं.

AFG vs IND Highlights And Score: टीम इंडियाची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल, अफगाणिस्तानचा 47 धावांनी उडवला धुव्वा
india vs afghanistanImage Credit source: BCCI

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारताने जबरदस्त सुरुवात केली आहे. टीम इंडियाने अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत केलं आहे. भारताने अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं होतं. पण अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 134 धावांवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने विकेट घेतली आणि अफगाणिस्तानचा डाव आटोपला. या विजयासह टीम इंडियाने या विजयासह सेमी फायनलच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडियाचा सुपर 8 मधील दुसरा सामना हा 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jun 2024 11:38 PM (IST)

    AFG vs IND Live Score: टीम इंडियाचा अफगाणिस्तानवर 47 धावांनी विजय

    टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला 47 धावांनी पराभूत केलं आहे. यामुळे दोन गुणांसह नेट रनरेटही चांगला झाला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा मार्ग आणखी सोप झाला आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

  • 20 Jun 2024 11:26 PM (IST)

    AFG vs IND Live Score: अर्शदीप सिंगचा दे धक्का, सलग दोन गडी केले बाद

    अर्शदीप सिंगने राशीद खाननंतर फलंदाजीसाठी आलेल्या नवीन उल हकला बाद केलं आहे. त्याचं हॅटट्रीक घेण्याचं स्वप्न मात्र भंगलं.

  • 20 Jun 2024 11:24 PM (IST)

    AFG vs IND Live Score: राशीद खान आऊट

    अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर राशीद खान बाद झाला आहे. रवींद्र जडेजाने त्याचा सोपा झेल घेतला.

  • 20 Jun 2024 11:13 PM (IST)

    AFG vs IND Live Score: नजीबुल्लाह झद्रान आऊट

    अफगाणिस्तानने सहावी विकेट गमावली आहे. नजीबुल्लाह झद्रान 17 बॉलमध्ये 19 धावा केल्या.

  • 20 Jun 2024 10:53 PM (IST)

    AFG vs IND Live Score: अझमतुल्लाह ओमरझई आऊट

    अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.  अझमतुल्लाह ओमरझई आऊट झाला आहे. ओमरझईने 20 बॉलमध्ये 26 धावांची खेळी केली.

  • 20 Jun 2024 10:50 PM (IST)

    AFG vs IND Live Score: गुलबदीन नईब आऊट

    अफगाणिस्तानने चौथी विकेट गमावली आहे. गुलबदीन नईब 21 बॉलमध्ये 17 धावा करुन आऊट झाला.

  • 20 Jun 2024 10:23 PM (IST)

    AFG vs IND Live Score: हजरतुल्लाह झझई आऊट

    जसप्रीत बुमराह याने हजरतुल्लाह झझई याला आऊट करत अफगाणिस्तानला तिसरा धक्का दिला आहे. झझईने 4 बॉलमध्ये 2 धावा केल्या. बुमराहची ही दुसरी विकेट ठरली.

  • 20 Jun 2024 10:20 PM (IST)

    AFG vs IND Live Score: इब्राहिम झद्रान आऊट

    अफगाणिस्तानने दुसरी विकेट गमावली आहे. इब्राहिम झद्रान कॅच आऊट होऊन माघारी परतला आहे. इब्राहिम झद्रानने 11 बॉलमध्ये 8 धावा केल्या.

  • 20 Jun 2024 10:11 PM (IST)

    AFG vs IND Live Score: अफगाणिस्तानला पहिला धक्का

    जसप्रीत बुमराहने अफगाणिस्तानला पहिला धक्का दिला आहे. बुमराहने रहमानउल्लाह गुरुबाज याला ऋषभ पंत याच्या हाती कॅच आऊट केलं. गुरुबाजने 8 बॉलमध्ये 11 धावा केल्या.

  • 20 Jun 2024 10:04 PM (IST)

    AFG vs IND Live Score: अफगाणिस्तानला 182 धावांचं आव्हान

    टीम इंडियाने अफगाणिस्तानला विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं आहे.  टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 181 धावा केल्या. टीम इंडियाकडून सूर्यकुमार यादव याने 53 आणि हार्दिक पंड्याने 32 धावांची खेळी केली. तर अफगाणिस्तानकडून राशिद खान आणि फझलहक फारुकी या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

  • 20 Jun 2024 09:41 PM (IST)

    AFG vs IND Live Score: रवींद्र जडेजा आऊट

    टीम इंडियाने सातवी विकेट गमावली आहे. रवींद्र जडेजा आऊट 7 धावा करुन माघारी परतला आहे.

  • 20 Jun 2024 09:40 PM (IST)

    AFG vs IND Live Score: हार्दिक पंड्या माघारी

    टीम इंडियाने सहावी विकेट गमावली आहे. उपकर्णधार हार्दिक पंड्या 24 बॉलमध्ये 32 धावा करुन कॅच आऊट झाला.

  • 20 Jun 2024 09:30 PM (IST)

    AFG vs IND Live Score: सूर्यकुमार यादव आऊट

    टीम इंडियाने पाचवी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव 28 बॉलमध्ये 53 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 20 Jun 2024 08:58 PM (IST)

    AFG vs IND Live Score: शिवम दुबे आऊट

    टीम इंडियाने चौथी विकेट गमावली आहे. शिवम दुबे एलबीडबल्यू आऊट झाला आहे. शिवमने 7 बॉल 10 रन्स केल्या.

  • 20 Jun 2024 08:42 PM (IST)

    AFG vs IND Live Score: विराट कोहली आऊट

    टीम इंडियाने तिसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. रोहित, ऋषभनंतर आता विराट कोहली आऊट झाला आहे. विराटने 24 बॉलमध्ये 24 धावा केल्या. टीम इंडियाचा स्कोअर हा 8.3 ओव्हरनंतर 3 आऊट 62 असा झाला आहे.

  • 20 Jun 2024 08:35 PM (IST)

    AFG vs IND Live Score: ऋषभ पंत 20 धावा करुन माघारी

    टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. विकेटकीपर बॅट्समन  ऋषभ पंत 11 बॉलमध्ये 20 धावा करुन आऊट झाला आहे. अफगाणिस्तान कॅप्टन राशिद खान याने ऋषभला एलबीडबल्यू आऊट केलं

  • 20 Jun 2024 08:31 PM (IST)

    AFG vs IND Live Score: टीम इंडियाच्या पावर प्लेमध्ये 47 धावा

    टीम इंडियाने पावर प्लेच्या पहिल्या आणि एकूण 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 47 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत 19 आणि विराट कोहली 17 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर कॅप्टन रोहित शर्मा 13 बॉलमध्ये 8 धावा करुन माघारी परतला.

  • 20 Jun 2024 08:14 PM (IST)

    AFG vs IND Live Score: रोहित शर्मा 8 धावांवर बाद

    टीम इंडियाने पहिली विकेट गमावली आहे. कॅप्टन रोहित शर्मा 13 बॉलमध्ये 8 धावा करुन कॅच आऊट झाला आह.

  • 20 Jun 2024 08:04 PM (IST)

    AFG vs IND Live Score: टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात, रोहित-विराट मैदानात

    टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली सलामी जोडी मैदानात आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडिया आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील पहिला सामना आहे.

  • 20 Jun 2024 07:55 PM (IST)

    AFG vs IND Live Update: अफगाणिस्तान प्लेइंग ईलेव्हन

    राशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, हजरतुल्ला झझई, गुलबदिन नायब, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नूर अहमद, नवीन-उल-हक आणि फजलहक फारूकी.

  • 20 Jun 2024 07:55 PM (IST)

    AFG vs IND Live Update: टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन

    रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह

  • 20 Jun 2024 07:54 PM (IST)

    AFG vs IND Live Update: टीम इंडियाने टॉस जिंकला

    टीम इंडियाने सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. मोहम्मद सिराज याच्या जागी कुलदीप यादव याला संधी देण्यात आली आहे. तर अफगाणिस्तानने करीम जनात याच्या जागी हजरतुल्ला झझई याचा समावेश केला आहे.

  • 20 Jun 2024 06:40 PM (IST)

    AFG vs IND Live Update: टीम इंडिया-अफगाणिस्तान हेड टु हेड रेकॉर्ड

    टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध अजिंक्य आहे. टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात 8 टी 20 सामने झाले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 7 सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागू शकला नाही.

  • 20 Jun 2024 06:33 PM (IST)

    AFG vs IND Live Update: टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघ

    टी 20 वर्ल्ड कपसाठी अफगाणिस्तान संघ: रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, अझमतुल्ला उमरझाई, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद इशाक, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, नांगयाल खरोती, नूर अहमद, नवीन-उल-हक, फझलहक फारुकी, फरीद अहमद मलिक आणि हजरतुल्लाह झझाई.

  • 20 Jun 2024 06:32 PM (IST)

    AFG vs IND Live Update: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया

    टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • 20 Jun 2024 06:26 PM (IST)

    AFG vs IND Live Update: अफगाणिस्तान टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी सज्ज

    टीम इंडिया आणि अफगाणिस्तान सुपर 8 मधील आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत. सुपर 8 ए ग्रुपमधील या संघांचा हा पहिला सामना आहे. सुपर 8 मध्ये प्रत्येक संघ 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत आयर्लंडला पराभूत करत विजयाने सुरुवात केली. तर अफगाणिस्ताननेही युगांडावर मात करत विजयी सुरुवात केली होती. त्यामुळे आता सुपर 8फेरीत दोन्ही संघ आपल्या पहिल्या सामन्यात कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Published On - Jun 20,2024 6:16 PM

Follow us
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्...
प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्याचं कारण समोर, पक्षाकडून मनधरणी अन्....
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा
साटम-शेलार अन् रंगा-बिल्याची खैर नाही, भाजप नेत्यावर मनसेचा निशाणा.
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका
...तोपर्यंत घाई नको, मनसे-ठाकरे सेनेच्या युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका.
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य
आता तो विषय संपला...नाराजीच्या मुद्द्यावर मुनगंटीवारांचं स्पष्टच भाष्य.
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना
प्रशांत जगतापांचा पुणे शहर अध्यक्षपदाचा राजीनामा, तातडीन मुंबईला रवाना.
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?
राणे बंधूंमधील राजकीय संघर्ष टोकाला,16 जानेवारीनंतर मोठा बॉम्ब फुटणार?.
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.