IND vs ENG : पाचव्या कसोटीवर कोरोनाचं संकट, रवी शास्त्रींनंतर सपोर्ट स्टाफमध्येही कोरोनाचा शिरकाव!

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत कोरोनाने शिरकाव केला आहे. रवी शास्त्रीनंतर भारताच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे पाचवी कसोटीही संकटात सापडली आहे.

IND vs ENG : पाचव्या कसोटीवर कोरोनाचं संकट, रवी शास्त्रींनंतर सपोर्ट स्टाफमध्येही कोरोनाचा शिरकाव!
भारतीय क्रिकेट संघ

लंडन : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील कसोटी मालिकेचा शेवटचा सामना शुक्रवारी (10 सप्टेंबर) रोजी सुरु होणार आहे. पण  या सामन्या पूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाला मोठा झटका बसला असून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर बोलिंग कोच भरत अरुण आणि फिलडिंग कोच आर श्रीधर यांच्यासह सपोर्ट स्टाफमधील सदस्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खेळाडूंटे बायो-बबलचे नियम आणकी कडक करुन ट्रेनिंग सेशनही रद्द करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे खेळाडूंना हॉटेल रुमबाहेर पडण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

या सर्वामुळे पाचवी टेस्ट खेळवण्याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. पाचव्या कसोटीबाबत अद्यापर्यंत कोणतीही ठोस माहिती आली नसली तरी सध्या सर्व खेळाडू कोरोनाच्या संकटामुळे रुममध्येच बंद आहेत. शास्त्री हे 5 सप्टेंबर रोजी कोरोनाबाधित आढळले होते. त्याची फ्लो टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर भरत अरुण, आर श्रीधर आणि नितिन पटेल यांना विलगीकरणात ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा सर्वांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. त्यानंतर शास्त्रींसह अरुण आणि श्रीधर हे देखील कोरोनाबाधित आढळे आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी दरम्यान हे सर्वजण विलगीकरणात असतील. दरम्यान या सर्वांना कोरोनाची लागण ही सामन्यादरम्यान झाली नसून एका खाजगी कार्यक्रमावेळी झाली आहे. शास्त्री हे त्यांच्या नव्या पुस्तकाच्या अनावरणासाठी आयोजित एका कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये असताना या सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. कारण या कार्यक्रमाला बाहेरुन अनेकजण आले होते.

पाचव्या कसोटीला दिग्गज फलंदाज मुकण्याची शक्यता

भारताचा दिग्गज फलंदाज आणि दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत आहे. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु आहे. दुखापत अजून वाढू नये यासाठी रोहित विश्रांती घेत आहे. तसंच त्याच्या पायाचा X-Ray ही काढण्यात आला असून त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर नेमकी दुखापत किती आहे? हे कळणार आहे. त्यानंतरच रोहित मॅनचेस्टरमध्ये होणाऱ्या (Manchester Test) पाचव्या कसोटी सामन्यात खेळेल का? हे स्पष्ट होईल.

हे ही वाचा

मोठी बातमी : भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींना कोरोनाची बाधा, आणखी चार सदस्य विलगीकरणात

IND vs ENG : भारतावर मोठं संकट, चौथी कसोटी सुरु असतानाच दिग्गज खेळाडू सामन्याबाहेर, पाचव्या कसोटीपूर्वी संघ अडचणीत

(After ravi shastri indian support staff of india tests positive for covid fifth india vs England Test is in danger)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI