Retirement : आणखी 1 भारतीय खेळाडू तडकाफडकी निवृत्त, रोहितच्या जागी मिळालेली संधी
Cricket Retirement : भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. 14 हजारांपेक्षा अधिक धावा करणाऱ्या स्टार खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. जाणून घ्या कोण आहे तो?

रोहित शर्मा आणि विराट कोहली या टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूंनी काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. रोहित विराटनंतर भारताच्या आणखी एका खेळाडूने क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. या स्टार खेळाडूने रोहित विराटप्रमाणेच सोशल मीडियावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. या खेळाडूने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. प्रियांक पांचाळ याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. प्रियांक पांचाळ याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भरीव योगदान दिलं. तसेच टीमला जिंकवण्यात निर्णायक भूमिका बजावली.
प्रियांका पांचाळ याने एकाएकी निवृत्तीचा निर्णय घेत फर्स्ट क्लास क्रिकेटमधील प्रवासाला अर्जंट ब्रेक लावला आहे. प्रियांक पांचाळ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातचं प्रतिनिधित्व करत होता. प्रियांक गुजरातच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. प्रियांकने अनेकदा अविस्मरणीय खेळी करत गुजरातचा एकहाती सामने जिंकून दिले होते. प्रियांकने त्याच्या कामगिरीची जोरावर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ठसा उमटवला होता. तसेच त्याने छापही सोडली होती. त्यामुळे प्रियांकला टीम इंडियात संधी मिळाली होती. मात्र दुर्देवाने प्रियांकला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
प्रियांक पांचाळच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये काय?
“मोठं होऊन प्रत्येक जण आपल्या वडिलांकडे पाहतो. वडिलांना आदर्श मानतो. वडिलांकडून प्रेरणा घेतो आणि त्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. मी ही या पेक्षा वेगळा नव्हतो. माझे वडील हे माझ्यासाठी उर्जेचा स्त्रोत होते. वडिलांनी दिलेल्या उर्जेमुळे मी प्रभावित झालो. मला वडिलांनी स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केलं. वडिलांनी मला माझ्या स्वप्नांचं पाठलाग करण्यासाठी, लहान शहरातून एक दिवस टीम इंडियाची टोपी घालण्याची आकांक्षा बाळगण्याचे धाडस करण्यास प्रोत्साहित केलं. त्यांनी आमची फार आधीच साथ सोडली. आणि हे एक स्वप्न होतं जे मी जवळपास 2 दशकं, सिजन टु सिजन, उराशी बाळगलं होतं. मी, प्रियांक पांचाळ तात्काळ प्रभावाने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे”, असं म्हणत प्रियांकने निवृत्ती जाहीर केली आणि वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला.
प्रियांक पांचाळची फर्स्ट क्लास क्रिकेट कारकीर्द
प्रियांकने त्याच्या कारकीर्दीतील 127 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 45.18 च्या सरासरीने 8 हजार 856 धावा केल्या. प्रियांकने या दरम्यान 34 अर्धशतकं आणि 29 शतकं झळकावली. तसेच 16 विकेट्स घेतल्या. तसेच प्रियांकने लिस्ट ए क्रिकेमधील 97 सामन्यांमध्ये 3 हजार 672 धावा केल्या. तर टी 20 क्रिकेटमध्ये 1 हजार 522 रन्स केल्या. प्रियांकने एकूण त्याच्या कारकीर्दीत 14 हजार धावा केल्या. प्रियांकची 2021 साली दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रोहित शर्मा याच्या दुखापतीनंतर निवड करण्यात आली होती. मात्र दुर्देवाने त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
