IND vs ENG : नाणेफेकीचा कौल गमवल्याचं दु:ख वाटते का? शुबमन गिलने स्पष्ट केलं की…
भारताने इंग्लंड दौऱ्यात अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 1-2 ने पिछाडीवर आहे. पण इंग्लंडला हा विजय काही सहज मिळाला नाही. चौथ्या कसोटीतही भारताने इंग्लंडच्या गोलंदाजांना नाचवलं. पण शुबमन गिलच्या मागे नाणेफेक गमवण्याचं शुक्लकाष्ट लागलं आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा आणि पाचवा निर्णायक सामना ओव्हल मैदानावर होणार आहे. दोन्ही संघांनी यासाठी कंबर कसली आहे. भारताला काही करून हा सामना जिंकावाच लागेल. तर आणि तरच ही मालिका बरोबरीत सुटेल. दुसरीकडे, इंग्लंडने हा सामना ड्रॉ किंवा विजय मिळवला तर मालिका खिशात घालेल. अशा स्थितीत भारतीय संघाला एक दु:ख सतावत आहे. शुबमन गिलने कसोटी संघाचं कर्णधारपद हाती घेतल्यापासून त्याच्या मागे नाणेफक गमवण्याचं शुक्लकाष्ठ लागलं आहे. आतापर्यंत झालेल्या चारही कसोटी सामन्यात भारताला नाणेफेक गमवावी लागली आहे.लीड्स, एजबॅस्टन आणि लॉर्ड्समध्ये टॉस गमावल्यानंतर, भारतीय कर्णधाराने मँचेस्टरमध्येही टॉस गमावला.त्यामुळे इंग्लंड देईल ते घ्यावं लागत आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौलाकडे लक्ष असणार आहे.
चौथा कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर शुबमन गिलला समालोचकांनी नाणेफेकीचा कौलाबाबत विचारलं. तेव्हा शुबमन गिल म्हणालाी की, ‘जोपर्यंत आम्ही सामना जिंकत आहोत, तोपर्यंत मला टॉसची खरोखर पर्वा नाही.’ दुसरीकडे, चौथ्या कसोटी सामन्यात नाणेपेकीचा कौल गमावल्यानंतर शुबमन गिल म्हणाला होता की, ‘मी थोडा संभ्रमात होतो. बरं नाणेफेकीचा कौल गमावला.’ असं देखील असू शकतं की शुबमन गिलने नाणेफेक गमावल्यानंतर जाणूनबुजून असे म्हटले असावे. जेणेकरून इंग्लंडच्या खेळाडूंना मानसिक फायदा होऊ नये.
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने सलग 14 वेळा टॉस गमावला आहे. शेवटचा टॉस जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20 सामन्यात जिंकला होता. इंग्लंडने जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तीन सामन्यांच्या वनडे आणि पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताचा दौरा केला होता. या दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदा पाच सामन्यांची टी20 मालिका पार पडली. यात तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला होता. त्यानंतर उर्वरित दोन टी20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस इंग्लंडने जिंकला. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत सर्वच्या सर्व टॉस गमावले. आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चारही टॉस गमावले. आता पाचव्या कसोटीत तरी नशिब साथ देईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी करत आहेत.
