IND vs PAK : W,W,W, कुलदीपची कमाल, पाकिस्तानला 127 धावांवर रोखलं, टीम इंडिया सलग दुसरा विजय मिळवणार?
Ind vs Pak Asia Cup 2025 : कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि इतर गोलंदाजांनी पाकिस्तानला ठराविक अंतराने झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

पाकिस्तानने टीम इंडियाला आशिया कप 2025 स्पर्धेतील सहाव्या सामन्यात विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं आहे. फिरकी गोलंदाजांनी केलेल्या चिवट बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाने पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 8 आऊट 127 रन्सवर रोखलं. पाकिस्तानचे एक वेळ 100 पर्यंत पोहचण्याचे वांदे होते. मात्र शाहिन शाह आफ्रिदी याने अखेरच्या क्षणी 33 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानला 127 धावांपर्यंत पोहचता आलं. आता टीम इंडियाचे फलंदाज हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पाकिस्तानसाठी शाहिन अफ्रीदी आणि ओपनर साहिबजादा फरहान यो जोडीने सर्वाधिक धावा केल्या. या दोघांनी केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानला 100 पार मजल मारता आली. मात्र या दोघांव्यतिरिक्त इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियासाठी कुलदीप यादव याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर इतरांनीही चांगली साथ दिली.
पाकिस्तानची बॅटिंग
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे टीम इंडियाच्या मनाप्रमाणे झाले. टीम इंडियाने बॉलिंग करण्याच्या संधीचा चांगलाच फायदा घेत कडक सुरुवात केली. भारताने पहिल्या 2 ओव्हरमध्ये पाकिस्तानला 2 झटके दिले. हार्दिक पंड्याने याने पहिल्याच बॉलवर सॅम अयुबला झिरोवर बोल्ड केलं. त्यानंतर जसप्रीत बुमराह याने सामन्यातील दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोहम्मद हारीस याला 3 धावांवर आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
त्यानंतर साहिबजादा आणि फखर झमान या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 39 रन्स जोडल्या. अक्षर पटेलने फखरला 17 रन्सवर आऊट करत ही सेट जोडी फोडली. त्यानंतर अक्षरने पुन्हा विकेट मिळवली. अक्षरने 10 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर कॅप्टन सलमान आगा याला 3 रन्सवर मैदानाबाहेरता रस्ता दाखवला.
त्यानंतर कुलदीप यादवने 13 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर पाकिस्तानला सलग 2 झटके दिले. कुलदीपने हसन नवाझ (5) आणि मोहम्मद नवाझ याला (0) आऊट केलं. कुलदीपने त्यानंतर 17 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर हार्दिक पंड्या याच्या हाती साहिबजादा याला आऊट करत मोठी खेळी करण्यापासून रोखलं. साहिबदाजाने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्यानंतर वरुण चक्रवर्थी याने फहीम अश्रफ याला 11 रन्सवर एलबीडब्ल्यू करत वैयक्तिक पहिली विकेट मिळवली. तर बुमराहने सुफीयान मुकीमला बोल्ड करत नववा झटका दिला. मुकीमने 10 धावा केल्या.
शाहीनची निर्णायक खेळी
दरम्यान शाहीनने अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केली. शाहीनने केलेल्या खेळीमुळे पाकिस्तानला भारतासमोर सन्माजनक आव्हान ठेवता आलं. शाहीनने 16 बॉलमध्ये 4 सिक्ससह नॉट आऊट 33 रन्स केल्या.
