AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia cup 2025 IND vs UAE Live Streaming : टीम इंडिया विजयी सुरुवातीसाठी सज्ज, पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार

Asia cup 2025 India vs United Arab Emirates Live Streaming : भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. या सामन्यात टीम इंडियासमोर यूएईचं आव्हान आहे.

Asia cup 2025 IND vs UAE Live Streaming : टीम इंडिया विजयी सुरुवातीसाठी सज्ज, पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध भिडणार
Shubman Gill and Hardik PandyaImage Credit source: PTI
| Updated on: Sep 09, 2025 | 11:20 PM
Share

बहुप्रतिक्षित आशिय कप 2025 स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून झालीय. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग बी ग्रुपमधील 2 संघ होते. आता 10 सप्टेंबरला ए ग्रुपमधील पहिला आणि या स्पर्धेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात गतविजेता टीम इंडिया विरुद्ध यजमान यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती आमनेसामने (UAE) असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील पहिला सामना असणार आहे. सूर्यकुमार यादव याचा कर्णधार म्हणून आशिया कप स्पर्धेतील हा पहिलाच सामना असणार आहे. तर मुहम्मद वसीम यजमान यूएईचं नेतृत्व करणार आहे. या सामन्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आशिया कप 2025 स्पर्धेतील सामने टी 20 फॉर्मेटने होत आहेत. आगामी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत जोरदार फटकेबाजी पाहायला मिळणार, यात काडीमात्र शंका नाही.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना केव्हा?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना बुधवारी 10 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजन 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध यूएई सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल. मात्र त्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. सोनी लिव्ह एपवर मोफत सामना पाहता येणार नाही.

शुबमन गिल उपकर्णधार

दरम्यान या आशिया कप स्पर्धेतून शुबमन गिल याचं टी 20I भारतीय संघात पुनरागमन झालं आहे. तसेच शुबमनला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे ओपनिंगला कोण येणार? हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन गेली अनेक महिने सातत्याने ओपनिंग करतोय. त्यामुळे शुबमनच्या एन्ट्रीनंतर संजूच्या स्थानात बदल केला जाणार की नाही? या प्रश्नाचं उत्तर सामन्यादरम्यानच मिळेल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.