AUS vs BAN : बांगलादेशकडून 140 धावांचं टार्गेट, मग ऑस्ट्रेलिया 100 धावा करून कसे जिंकले? जाणून घ्या.

AUS vs BAN T-20 2024 : T-20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलिया-बांगलादेश सामना अँटिग्वा येथे पार पडला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने बांगलादेशने दिलेलं टार्गेट पूर्ण न करूनही सामना कसाकाय जिंकला.

AUS vs BAN : बांगलादेशकडून 140 धावांचं टार्गेट, मग ऑस्ट्रेलिया 100 धावा करून कसे जिंकले? जाणून घ्या.
Follow us
| Updated on: Jun 21, 2024 | 11:27 PM

आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 मधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश झाला. बांगलादेशचा या सामन्यामध्ये कांगारूंनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 140-8 धावा केल्या. या सामन्यातच पॅट कमिन्सने वर्ल्ड कपध्ये पहिली हॅट्रिक घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. हा सामना ऑस्ट्रेलियन संघाने बांगलादेशच्या धावांचा पाठलाग करताना 100 धावा केल्या तरीपण कसाकाय जिंकला? असा प्रश्न अनेकांना पडला. कांगारूंनी टार्गेट न करताही या सामन्याचा निकाल त्यांच्या बाजूने कसा काय लागला समजून घ्या.

बांगलादेशने 20 ओव्हर 8 गडी गमावून 140 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 141 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. कर्णधार नजमुल शांतोने 41 तर तौहीद हृदयने 40 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया बॅटींगला उतरल्यावर पावसाने हजेरी लावली. 6.2 ओव्हरमध्ये पहिल्यांदा पाऊस पडला, त्यावेळी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 64/0 होती आणि डकवर्थ लुईस पद्धतीनुसार त्यांची धावसंख्या 35/0 असायला हवी होती. ऑस्ट्रेलियाने 11.2 ओव्हरमध्ये 2 बाद 100 धावा केल्या होत्या. तर डकवर्थ लुईस पद्धतीनुसार ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 2 विकेट जात 72 धावा असती तर विजय त्यांच्या बाजूनेच लागला असता.

सुपर-8 गट-1 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाचा रनरेट भारतापेक्षा चांगला आहे. त्यामुळे रनरेट आधारावर दोन गुणांसह अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +2.471 आहे, तर भारताचा निव्वळ रन रेट +2.350 आहे. भारताने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला असून ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाला आपला पुढचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळायचा आहे आणि भारताला आपला पुढचा सुपर-8 सामना बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे.

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास (WK), नजमुल हुसेन शांतो (C), शकीब अल हसन, तौहिद ह्रदोय, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसैन, तस्किन अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (C), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (WK), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.