AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Test Cricket : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह WTC Points Table मध्ये धमाका, इंग्लंडची वाईट स्थिती, टीम इंडिया कितव्या स्थानी?

ICC World Test Championship 2025 Points Table: ऑस्ट्रेलियाने एशेस सीरिजमध्ये इंग्लंडला सलग दुसर्‍या सामन्यात पराभूत केलं. ऑस्ट्रेलियाला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये चांगला फायदा झाला आहे. जाणून घ्या ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी.

Test Cricket : ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्या विजयासह WTC Points Table मध्ये धमाका, इंग्लंडची वाईट स्थिती, टीम इंडिया कितव्या स्थानी?
Australia Wtc Points TableImage Credit source: Icc X Account
| Updated on: Dec 07, 2025 | 8:11 PM
Share

ऑस्ट्रेलियाने मायदेशात सुरु असलेल्या एशेस सीरिजमध्ये आपला दबदबा कायम राखत इंग्लंडचा सलग दुसऱ्या सामन्यात धुव्वा उडवला आहे. ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेनमधील द गाबातील डे-नाईट टेस्टमध्ये चौथ्या दिवशी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाने यासह मालिका जिंकण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. तसेच ऑस्ट्रेलियाने या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये (WTC 2025-2027 Points Table) आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. तर या पराभवामुळे इंग्लंडची वाईट स्थिती झाली आहे. या सलगच्या 2 पराभवांमुळे इंग्लंडचं अंतिम फेरीत पोहचणं अवघड झालं आहे. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी आहे? हे सविस्तर जाणून घेऊयात.

इंग्लंडने या ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 65 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान फक्त 2 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाची या मालिकेत 8 विकेट्सने सामना जिंकण्याची सलग दुसरी वेळ ठरली.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती काय?

ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीत आतापर्यंत अजिंक्य आहे. ऑस्ट्रेलियाने या साखळीत 5 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 60 पॉइंट्स आहेत. तर ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी ही 100 टक्के इतकी आहे. या साखळीतील एका विजयासाठी 12 पॉइंटसची तरतूद आहे.

दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी

गतविजेता दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेने एकमेव सामना गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 36 पॉइंट्स आहेत. तर दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी ही 75 इतकी आहे. तर टीम इंडिया पाचव्या स्थानी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका सामन्याच्या निकालाचा परिणाम टीम इंडियावर झाला नाही.

टीम इंडियाची कामगिरी कशी ?

टीम इंडियाने या साखळीत आतापर्यंत एकूण 9 सामने खेळले आहेत. भारताला 9 पैकी 4 सामन्यांमध्ये विजयी होता आलं आहे. तर 4 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर 1 सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे टीम इंडियाच्या खात्यात 52 पॉइंट्स आहेत. तर टीम इंडियाची विजयी टक्केवारी 48.15 इतकी आहे. पॉइंट्स टेबलमधील अव्वल 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात.

ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी कायम

इंग्लंडची फायनल वारी अवघड!

दरम्यान इंग्लंडच्या सुमार कामगिरीमुळे ते सातव्या स्थानी आहेत. त्यामुळे इंग्लंडची फायनल वारी अवघड असल्याचं समजलं जात आहे. इंग्लंडने या साखळीत 7 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. इंग्लंडच्या खात्यात 26 पॉइंट्स आहेत. तर विजयी टक्केवारी ही 30.95 अशी आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.