BAN vs PAK : बांगलादेश सलग दुसरी टी 20I मालिका जिंकण्यासाठी सज्ज, पाकिस्तानची लाज निघणार?
Bangladesh vs Pakista 2nd T20I Preview : बांगलादेश क्रिकेट टीम लिटन दास याच्या नेतृत्वात पाकिस्तानचा सलग दुसर्या सामन्यात धुव्वा उडवून सलग दुसरी टी 20i मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे.

बांग्लादेश क्रिकेट टीमचा धमाका सुरु आहे. बांगलादेशने श्रीलंका दौऱ्याचा शेवट गोड केला. बांगलादेशला श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर बांगलादेशने जोरदार कमबॅक केलं. बांग्लादेशेने लिटन दास याच्या नेतृत्वात सलग 2 सामने जिंकले. बांगलादेशने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 ने आपल्या नावावर केली. त्यानंतर बांगलादेशने मायदेशातील टी 20i मालिकेत पाकिस्तान विरुद्ध विजयी सलामी दिली. त्यामुळे बांगलादेशला सलग दुसरा सामना जिंकून मालिका नावावर करण्याची दुहेरी संधी आहे.
लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करत आहे. तर सलमान आघा पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना केव्हा?
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मंगळवारी 22 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना कुठे?
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना ढाक्यातील शेरे ए बांगला स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. मालिकेतील पहिला सामना हा याच मैदानात खेळवण्यात आला होता.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही.
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान दुसरा टी 20i सामना मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे पाहायला मिळेल.
बांगलादेशने रविवारी 20 जूनला झालेल्या पहिल्या टी 20i सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी मात करत विजयी सुरुवात केली. पाकिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 111 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. बांगलादेशने हे आव्हान 93 चेंडूतच पूर्ण केलं. बांगलादेशने 15.3 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 112 धावा केल्या आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
पाकिस्तानसाठी शेवटची संधी
आता मंगळवारी दुसऱ्या सामन्यात बांगलादेश मालिका जिंकण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. तर पाकिस्तानला मालिकेत कायम रहायचं असेल तर दुसरा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. या सामन्यात कोण मैदान मारतं? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
