Ban vs Ind : भारतीय क्रिकेटसाठी इतिहासातील सर्वात वाईट दिवस, टीम इंडियावर मोठी नामुष्की
भारतीय क्रिकेटसाठी इतिहासातील सर्वात वाईट दिवस ठरला आहे. महिला भारतीय संघाचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव झालेला आहे. हा फक्त पराभव नसून टीम इंडियाचा इतक्या दिवसांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे.

मुंबई : टीम इंडियाचा महिला संघ बांगलादेश दौऱ्यावर असून आताच टी-20 मालिका पार पडली. टीम इंडियाने ही मालिका 2-1 ने जिंकली. मात्र त्यानंतर बांगलादेश संघाने एकदिवसीय मालिकेमधील पहिला सामना जिंकत विजय साकारला आहे. पावसामुळे या सामन्यातील ओव्हर कमी करण्यात आल्या होत्या. मात्र पहिला सामना जिंकत बांगलादेश संघाने इतिहास रचला आहे. कारण त्यांनी भारताला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदा पराभूत केलं आहे.
सामन्याचा धावता आढावा
टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 44 ओव्हरचा ठेवण्यात आला होता. बांगलादेश संघाने 35.5 ओव्हरमध्ये 113 धावा केल्या यामध्ये निगार सुलताना हिने सर्वाधिक 39 धावा आणि फरगाना हक हिने 27 धावा करत महत्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या अमनजोत कौरने 31 धावा देत 4 विकेट्स घेतल्या.
टीम इंडिया हे आव्हान सहज पूर्ण करेल असं वाटलं होतं मात्र उलटच झालं. बांगलादेश संघाच्या मारुफा अक्तर हिने 4 आणि राबेया खातूनने 3 विकेट्स घेत इंडियाला 113 धावांच्या आतमध्ये गुंडाळलं. टीम इंडियाच्या मुख्य बॅटर स्मृती मानधना 11 धावा, प्रिया पुनिया 10 धावा, जेमिमाह रॉड्रिग्स 10 धावा, हरमनप्रीत कौर 5 धावा आणि दीप्ति शर्मा 20 धावा करून बाद झाल्या.
दरम्यान, बांगलादेश संघाने मिळवलेल विजय ऐतिहासिक आहे. कारण याआधी महिला संघाने कधीच टीम इंडियाच्या महिला संघाला एकदिवसीय क्रिकेटमध्ये नमवलं नव्हतं. आता पुढचे दोन्ही सामने टीम इंडियासाठी जिंकणं महत्त्वाचं कारण एकही सामना गमावला तरी मालिक हातातून जाऊ शकते.
बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): मुर्शिदा खातून, शर्मीन अख्तर, फरगाना हक, निगार सुलताना (W/C), शोर्ना अक्टर, नाहिदा अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खातून, मारुफा अक्तर, सुलताना खातून
भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, प्रिया पुनिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), यास्तिका भाटिया (W), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, बरेड्डी अनुशा
