BCCI कडून वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचं काय?

BCCI announces annual player retainership 2023-24 | बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळांडूसाठी वार्षिक करार जाहीर केला आहे. या वार्षिक करारामध्ये टीम इंडियाच्या एका खेळाडूला मोठी लॉटरी लागली आहे.

BCCI कडून वार्षिक करार जाहीर, श्रेयस अय्यर आणि ईशान किशनचं काय?
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 6:26 PM

मुंबई | भारतीय क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाने 2023-2024 या काळासाठी वार्षिक करार जाहीर केला आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयकडून टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा याला सर्वात मोठी गूड न्यूज मिळाली आहे. तर विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर याला मोठा झटका लागला आहे.

बीसीसीआय भारतीय खेळाडूंना ए प्लस, ए, बी आणि सी अशा 4 श्रेणींनुसार वर्गवारी करते. त्या वर्गवारीनुसार खेळाडूंना वार्षिक वेतन ठरतं. त्यानुसार बीसीसीआयच्या ए प्लस या कॅटेगरीमध्ये आधी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली या तिघांचा समावेश होता. यामध्ये आता रवींद्र जडेजा याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहित, विराट, बुमराह याच्यासह जडेजालाही वार्षिक 7 कोटी रुपये मिळणार आहेत. तसेच बीसीसीआयने  अनेक युवा खेळाडूंचाही पहिल्यांदा वार्षिक करारात समावेश केला आहे.

कोणत्या ग्रेडमध्ये कोणते खेळाडू?

ए प्लस | रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा.

ए | रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, केएल राहुल, शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या.

बी | सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जयस्वाल.

सी | रिंकू सिंह, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकुर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंगटन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंह, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

बीसीसीआयकडून सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर

ग्रेडनुसार किती रक्कम मिळते?

बीसीसीआयच्या वार्षिक करारामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक अनुक्रमे 7, 5, 3 आणि 1 कोटी रुपये मिळतात. या व्यतिरिक्त प्रत्येक कसोटी, वनडे आणि टी 20 सामन्यासाठी 15, 9 आणि 3 लाख रुपये दिले जातात. विशेष बाब म्हणजे ए प्लस श्रेणीत वनडे, टी 20 आणि टेस्ट अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश असतो.

Non Stop LIVE Update
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरे फुसका... ठाकरे गटातील नेत्यांची जिव्हारी लागणारी टीका.
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार
निषेध... No वोट, मुंबईच्या 'या' भागातील नागरिकांचा मतदानावरच बहिष्कार.
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?
महायुतीकडून नार्वेकर लोकसभा लढणार? दक्षिण मुंबईच्या जागेसाठी मोठी खळी?.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? महायुतीची मोठी ऑफर काय?.
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरे नालायक तर आदित्य ठाकरेंची लायकी काय?, भाजपच्या नेत्याचा हल्लाबोल.
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्...
धनगर आरक्षणास मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली अन्....
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार
यंदा इतिहास घडणार,18 वर्षानंतर राज ठाकरे 'धनुष्यबाणा'साठी प्रचार करणार.
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले
पहाटेच्या त्या शपथविधीवरून अजितदादांचा धमाका, ...आणि शरद पवार पलटले.
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर
ठाकरेंना वेड लागलं... ठाकरेंच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?
सर्व साहेबांनी केलं, मग 32 वर्ष मी काय... अजित पवारांचा कुणावर निशाणा?.