DC vs CSK, LIVE Score, IPL 2021 Playoff : थरारक सामन्यात चेन्नईची दिल्लीवर 4 विकेट्सने मात, धोनी स्टाईलमध्ये मॅच फिनिश

आयपीएल 2021 ची निर्णायक फेरी आजपासून सुरू होत आहे. या हंगामातील प्लेऑफ सामन्यांमधील पहिला सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात होत आहे.

DC vs CSK, LIVE Score, IPL 2021 Playoff : थरारक सामन्यात चेन्नईची दिल्लीवर 4 विकेट्सने मात, धोनी स्टाईलमध्ये मॅच फिनिश
DC vs CSK Live Score

आयपीएल 2021 स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या हंगामातील प्लेऑफ सामन्यांमधील पहिला सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (DC vs CSK) यांच्यात खेळवला गेला. दुबई इंटरनॅशनल स्टेडियम येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 4 विकेट्सने मात केली आहे. त्याचबरोबर आज क्रिकेटरसिकांना चेन्नईच्या रुपात यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील पहिला फायनलिस्ट मिळाला आहे. दिल्लीवर मात करत चेन्नईने फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 172 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी चार विकेट्स आणि 2 चेंडू राखून हे आव्हान पूर्ण केलं आहे. सुरुवातीला ऋतुराज गायकवाड आणि रॉबिन उथप्पाने या सामन्यात शतकी भागिदारी करत चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात धुवांधार फलंदाजी करत कर्णधार महेंद्रसिंह धोनीने त्यावर कळस चढवला. धोनीने त्याच्या आक्रमक शैलीत ही मॅच फिनिश केली. धोनीने 6 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 18 धावा जमवल्या.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 10 Oct 2021 23:12 PM (IST)

  चेन्नईला मोठा झटका, मोईन अली 16 धावांवर बाद

  img

  टॉम करनने चेन्नईला मोठा झटका दिला आहे. त्याने मोईन अलीला कगिसो रबाडाकरवी झेलबाद केलं. चेन्नईला विजयासाठी 5 चेंडूत 13 धावांची आवश्यकता (चेन्नई 160/6)

 • 10 Oct 2021 23:06 PM (IST)

  चेन्नई सुपरकिंग्जला मोठा झटका, ऋतुराज गायकवाड 70 धावांवर बाद

  img

  चेन्नई सुपरकिंग्जने मोठी विकेट गमावली आहे. आवेश खानने ऋतुराज गायकवाडला 70 धावांवर असताना अक्सर पटेलकरवी झेलबाद केलं (चेन्नई 149/5)

 • 10 Oct 2021 22:46 PM (IST)

  चेन्नईचा चौथा फलंदाज माघारी, अंबाती रायुडून शून्यावर बाद

  img

  चेन्नई सुपरकिंग्सने चौथी विकेट गमावली आहे. श्रेयस अय्यरने अंबाती रायुडूला (1) धावबाद केलं. (चेन्नई 119/4)

 • 10 Oct 2021 22:43 PM (IST)

  चेन्नईला तिसरा धक्का, शार्दुल ठाकूर शून्यावर बाद

  img

  चेन्नई सुपरकिंग्सने तिसरी विकेट गमावली आहे. टॉम करनने शार्दुल ठाकूरला शून्यावर माघारी धाडलं. श्रेयस अय्यरने सोपा झेल घेत त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (117/3)

 • 10 Oct 2021 22:41 PM (IST)

  ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक

  ऋतुराज गायकवाडने 37 चेंडूत अर्धशतक झळकावलं आहे. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहेत.

 • 10 Oct 2021 22:38 PM (IST)

  चेन्नई सुपरकिंग्सला दुसरा झटका, रॉबिन उथप्पा 63 धावांवर बाद

  img

  चेन्नई सुपरकिंग्सने दुसरी विकेट गमावली आहे. टॉम करनने रॉबिन उथप्पाला 63 धावांवर असताना श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. (चेन्नई 113/1)

 • 10 Oct 2021 22:35 PM (IST)

  रॉबिन उथप्पाचं अर्धशतक

  35 चेंडूत रॉबिन उथप्पाने अर्धशतक झळकावलं आहे. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार ठोकले आहेत.

 • 10 Oct 2021 21:37 PM (IST)

  पहिल्याच षटकात चेन्नईला मोठा झटका, फाफ डुप्लेसी बाद

  img

  पहिल्याच षटकात चेन्नईने मोठी विकेट गमावली आहे. एनरिच नॉर्खियाने फाफ डुप्लेसीला त्रिफळाचित केलं. (चेन्नई 3/1)

 • 10 Oct 2021 21:06 PM (IST)

  दिल्लीचा पाचवा गडी माघारी, शिमरन हेटमायर 37 धावांवर बाद

  img

  दिल्लीने पाचवी विकेट गमावली आहे. ड्र्वेन ब्राव्होने शिमरन हेटमायरला 37 धावांवर असताना रवींद्र जाडेजाकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 163/5)

 • 10 Oct 2021 20:20 PM (IST)

  दिल्लीचा चौथा फलंदाज माघारी, पृथ्वी शॉ 60 धावांवर बाद

  img

  दिल्लीने चौथी विकेट गमावली आहे. रवींद्र जाडेजाने पृथ्वी शॉला 60 धावांवर असताना फाफ डुप्लेसीकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 80/4)

 • 10 Oct 2021 20:17 PM (IST)

  दिल्लीला तिसरा धक्का, अक्सर पटेल 10 धावांवर बाद

  img

  दिल्लीने तिसरी विकेट गमावली आहे. मोईन अलीने अक्सर पटेलला सँटनरकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 77/3)

 • 10 Oct 2021 20:11 PM (IST)

  पृथ्वी शॉचं 27 चेंडूत अर्धशतक, दिल्ली सुस्थितीत

  img

  पृथ्वी शॉने 27 चेंडूत शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. 9 व्या षटकात रवींद्र जाडेजाला चौकार लगावत पृथ्वीने अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार ठोकले.

 • 10 Oct 2021 20:02 PM (IST)

  दिल्लीला दुसरा झटका, धवनपाठोपाठ श्रेयस अय्यर बाद

  img

  दिल्लीने दुसरी विकेट गमावली आहे. जोश हेजलवूडने श्रेयस अय्यरला ऋतुराज गायकवाडकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 50/2)

 • 10 Oct 2021 19:49 PM (IST)

  दिल्लीला पहिला झटका, शिखर धवन 7 धावांवर बाद

  img

  दिल्लीने पहिली विकेट गमावली आहे. जोश हेजलवूडने शिखर धवनला यष्टीरक्षक एमएस धोनीकरवी झेलबाद केलं. (दिल्ली 36/1)

 • 10 Oct 2021 19:36 PM (IST)

  दिल्लीच्या डावाला सुरुवात, पृथ्वी-शिखर जोडी मैदानात

  दिल्लीच्या डावाला सुरुवात झाली आहे. सलामीवीर पृथ्वी शॉ आणि शिखर धवन ही जोडी मैदानात दाखल झाली असून चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने चेंडू दीपक चाहरच्या हाती सोपवला आहे.

 • 10 Oct 2021 19:07 PM (IST)

  नाणेफेक जिंकून चेन्नईचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

  चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 • 10 Oct 2021 19:03 PM (IST)

  DC vc CSK : प्लेऑफमध्ये दुसऱ्यांदा टक्कर

  img

  प्लेऑफबद्दल बोलायचे झाल्यास, येथे चेन्नईचे एकतर्फी वर्चस्व आहे. दिल्ली आणि चेन्नई यापूर्वी दोन वेळा प्लेऑफमध्ये एकमेकांशी भिडले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये चेन्नईने दोन्ही वेळा दिल्लीला धूळ चारली आहे. 2012 मध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा भिडले, तेव्हा दिल्लीला 86 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर 2019 मध्ये दोघांची पुन्हा टक्कर झाली आणि यावेळी चेन्नईने 6 गडी राखून विजय मिळवला.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI