ENG vs SL: श्रीलंकेकडून दुसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर, 2 वर्षांनंतर फलंदाजाची एन्ट्री
England vs Sri Lanka 2nd Test Playing 11: पहिल्या कसोटीतील पराभवानंतर श्रीलंकेने दुसर्या सामन्यात मोठे बदल केले आहेत. श्रीलंकेने इंग्लंड विरुद्ध दुसर्या सामन्यासाठी दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना हा 29 ऑगस्टपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. इंग्लंड या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं होतं.त्यानंतर आता श्रीलंकेने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा करण्यात आली आहे.श्रीलंका क्रिकेटने दुसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल
श्रीलंकेने कुसल मेंडीस आणि विश्वा फर्नांडो या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कुसलच्या जागी पाथुम निसांका याला संधी देण्यात आली आहे. तर विश्वा फर्नांडो याला डच्चू देत लहिरु कुमारा याचा समावेश करण्यात आला आहे. मेंडीसने पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात अवघ्या 24 धावा केल्या होत्या. तर विश्वा फर्नांडो याला 2 विकेट्सच घेण्यात यश आलं होतं. त्यामुळे या दोघांना बाहेर बसवण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
पाथुम निसांकाचं कसोटी क्रिकेटमध्ये 2 वर्षांनी पुनरागमन झालं आहे. पाथुमचे गेल्या अनेक महिन्यांपासून कमबॅकसाठी प्रयत्न सुरु होते. पाथुमची अखेर प्रतिक्षा संपली आहे. पाथुमने श्रीलंकेसाठी 2021 कसोटी पदार्पण केलं. त्यानंतर पाथुमने जुलै 2022 मध्ये गॉल येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता. तसेच पाथुम निसांकाने टीम इंडिया विरुद्ध झालेल्या व्हाईट बॉल सीरिजमध्ये शानदार कामगिरी केली होती. पाथुम श्रीलंकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिलाच फलंदाज आहे.
श्रीलंका दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज
Sri Lanka announced playing XI for the 2nd Test Match, which will start tomorrow at the Lord’s Cricket Ground London.https://t.co/C4mvw0eQ97 #ENGvSL
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) August 28, 2024
दुसर्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : ओली पोप (कॅप्टन), डॅनियल लॉरेन्स, बेन डकेट, जो रूट , हॅरी ब्रुक, जेमी स्मिथ (विकेटकीपर), क्रिस वोक्स, गस एटकिंसन, मॅथ्यू पॉट्स, ओली स्टोन आणि शोएब बशीर
इंग्लंड विरूद्धच्या दुसर्या कसोटीसाठी श्रीलंकेची प्लेइंग ईलेव्हन: धनंजय डी सिल्वा (कॅप्टन), दिमुथ करुणारत्ने, निशान मदुष्का, पथुम निसंका, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडीमल,कामिंदु मेंडिस, प्रभात जयसूर्या, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा आणि मिलन रत्नाययके.
