1.2.3.4..! वुमन्स प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात एका पाठोपाठ एक विक्रमांचा धडाका, झालं असं की..
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील तिसऱ्या पर्वातील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी घेतली. तर गुजरात जायंट्सने होमग्राउंडवर विक्रमांचा धडाका लावला. पहिल्या सामन्यात काय विक्रम नोंदवले ते जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. दव फॅक्टर आणि खेळपट्टीचा अंदाज असल्याने आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरात टायटन्सने आरसीबीच्या गोलंदाजांना चांगलाच घाम फोडला. 20 षटकात पाच गडी गमवून 201 धावा केल्या आणि विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पाचवी मोठी धावसंख्या आहे. गुजरातने 5 गडी गमवून 201 धावा केल्या. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 2023 मध्ये रंगलेल्या सामन्यात 223 धावा झाल्या होत्या. तर 2023 मध्येच दिल्ली विरुद्ध युपी वॉरियर्स या सामन्यात 211 धावा, 2023 मध्येच मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यात रंगलेल्या सामन्यात 207 धावा, 2023 मध्ये रंगलेल्या गुजरात विरुद्ध आरसीबी सामन्यात 201 धावा झाल्या होत्या.
या सामन्यात चौकार आणि षटकारांचा नुसता वर्षाव झाला. एशले गार्डनरने आरसीबीविरुद्ध 8 षटकार ठोकत सोफी डिव्हाईनच्या विक्रमाशी बरोबरी केली. सोफी डिव्हाईनने 2023 मध्ये गुजरात जायंट्स विरुद्ध एकाच सामन्यात 8 षटकार ठोकले होते. दुसरीकडे, या सामन्यातील एका डावात एकूण 10 षटकार मारले गेले. एका षटकाराने फक्त विक्रम हुकला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 2024 मध्ये रंगलेल्या सामन्यात 11 षटकार एका डावात आले होते. दरम्यान, गार्डनर आणि डॉटिन या जोडीने 12.96 चा धावगती हा 50 हून अधिक धावांची भागीदारी केली. 31 चेंडूत 67 धावा ही गुजरात जायंट्समधील सर्वाधिक धावसंख्या आहे.गुजरात जायंट्सकडून एशले गार्डनरने सर्वाधिक नाबाद 79 धावांची खेळी केली. तिने 37 चेंडूत 8 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 79 धावा केल्या. त्यानंतर बेथ मूनीने 42 चेंडूत 8 चौकाराच्या मदतीने 56 धावा केल्या.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (कर्णधार), डॅनियल व्याट-हॉज, एलिस पेरी, रघवी बिस्ट, रिचा घोष (विकेटकीपर), कनिका आहुजा, जॉर्जिया वेरेहम, किम गर्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.
गुजरात जायंट्स महिला (प्लेइंग इलेव्हन): लॉरा वोल्वार्ड, बेथ मूनी (विकेटकीपर), दयालन हेमलता, ॲशलेग गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी गौतम.
