AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात बिनसलं? तशा वागण्यातून सोशल मीडियावर संशयाचं वारं

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या हार्दिक पांड्याचं कमबॅक हवं तसं झालं नाही. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा मिळाली खरी..पण हा मुकूट काही पेलवला नाही. उलट पाचवेळा जेतेपदाचा मानकरी असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला सर्वात शेवटच्या स्थानी राहावं लागलं. असं असताना आता रशियन पत्नी नताशा स्टनकोविच आणि त्याच्या नात्याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात बिनसलं? तशा वागण्यातून सोशल मीडियावर संशयाचं वारं
| Updated on: May 23, 2024 | 5:25 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धा मुंबई इंडियन्ससाठी एक दु:खद स्वप्न होतं. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची निराशाजनक कामगिरी राहिली. हार्दिक पांड्याच्या क्रिकेट कारकिर्दितील हा सर्वात वाईट काळ असेल. पण मुंबई इंडियन्सची सूत्र हाती घेतल्यापासून हार्दिक पांड्या या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. आयपीएलमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तसं काही झालं नाही. पाचवेळा जेतेपद मिळवलेल्या मुंबई इंडियन्स संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. आता हार्दिक पांड्याकडे टी20 वर्ल्डकप स्पर्धेत उपकर्णधारपदाची माळ गळ्यात घालण्यात आली आहे. त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. असं सर्व असताना आता हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यात बरंच काही घडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याबाबत अधिकृतरित्या कोणालाच माहिती नसून फक्त अंदाज बांधले जात आहेत. सोशल मीडियावर कधी कोणाबाबत काय चर्चा रंगेल सांगता येत नाही. यावेळी रंगलेल्या चर्चेत काही तथ्य मांडण्यात आले आहेत. त्यामुळे त्या बातम्या सध्या खऱ्या नसल्या तरी संशयाला वाट करून देणाऱ्या आहेत.

हार्दिक पांड्या आणि रशियन पत्नी नताशा स्टॅन्कोविच यांच्यात बिनसल्याची चर्चा रंगली आहे. दोघेही वेगळे झाल्याचं बोललं जात आहे. हार्दिक-नताशा हे क्रिकेटमधील सर्वात चर्चेत असणारं जोडपं आहे. हे जोडपं प्रत्येक क्षणांचं अपडेट सोशल मीडियावर करताना चाहत्यांनी पाहिलं आहे. दोघंनी 2020 मध्ये लग्नबंधनात अडकले आणि त्यांना मुलंही आहेत. या लग्नाला क्रिकेट जगतातील अनेक दिग्गज उपस्थित होते. 2023 च्या शेवटी त्याने लग्नाचा दिमाखदार सोहळाही केला. पण अचानक त्यांच्या नात्याबाबत अफवा पसरण्याचं कारण काय? त्याबाबत सोशल मीडियावर वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत.

आयपीएल 2024 च्या संपूर्ण पर्वात नताशा मैदानावर दिसली नाही. हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद असूनही नताशा मैदानात न दिसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. हार्दिक पांड्या वाईट काळातून जात असताना त्याचं मनोबळ वाढवण्यासाठी नताशा मैदानात का येत नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात होता. दरम्यान, 4 मार्च रोजी नताशाचा वाढदिवस होता. तेव्हा हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत. त्यामुळे या अफवांना अधिक वेग आला. दुसरीकडे, नताशाने तिच्या इंस्टाग्राम बायोमधून पांड्या हे आडनाव काढलं आहे. तसेच हार्दिकसोबतचे फोटोही डिलीट केले आहेत. त्यामुळे या बातम्या अधिक वेगाने पसरू लागल्या आहेत. पण याबाबत दोघांनी अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही. पण सध्या हार्दिक पांड्या कठीण काळातून जात असल्याची चर्चा रंगली आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.