AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकपबाबत इशान किशनचं मोठं वक्तव्य, प्रश्न विचारताच म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध इशान किशनची बॅट चांगलीच तळपली. इशान किशनने 34 चेंडूत 69 धावांची वादळी खेळी केली. यामुळे इशान किशनला पुन्हा एकदा सूर गवसल्याचं दिसत आहे. तसंच टी20 वर्ल्डकपसाठी दावाही प्रस्थापित केला आहे. याबाबाबत त्याला विचारलं असता म्हणाला...

टी20 वर्ल्डकपबाबत इशान किशनचं मोठं वक्तव्य, प्रश्न विचारताच म्हणाला...
| Updated on: Apr 12, 2024 | 5:19 PM
Share

आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचा विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याच्याबाबत बऱ्यात बातम्या समोर आल्या होत्या. दक्षिण अफ्रिका दौरा मध्यात सोडून आल्यापासून ते आयपीएल खेळेपर्यंत बरंच काही घडलं. बीसीसीआयने वारंवार देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी इशारा दिला. मात्र इशानने त्याला केराची टोपली दाखवल्याचं पाहिलं गेलं. त्यानंतर इशान किशन थेट आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला. सुरुवातीच्या काही सामन्यात इशान किशनला लय सापडली नाही. मात्र मागच्या दोन सामन्यात इशान किशनने साजेशी कामगिरी केली. इतकंच काय तर रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात 34 चेंडूत 69 धावांची खेळी केली. आयपीएलमधील 5 सामन्यात इशान किशनने 161 धावा केल्या आहेत. तसेच स्ट्राईक रेट हा 182.95 चा आहे. पत्रकार परिषदेत त्याला टी20 वर्ल्डकपबाबत विचारलं गेलं. यावर इशान किशनने आपल्या शैलीत उत्तर दिलं.

“विश्वचषकाबद्दल सांगायचं तर ते काही माझ्या हातात नाही. मी सध्या काही गोष्टी शांतपणे सोडवत आहे. एकावेळी मी एका सामन्याचा विचार करत आहे. खेळाडूंच्या हातात तसं काही नसतं ही बाब समजून घेणं आवश्यक आहे.”, असं इशान किशन सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला. “ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि त्यात अतिउत्साही होण्याची गरज नाही. मी फक्त एकावेळी एका सामन्याचा विचार करतो. संघासाठी जे काही महत्त्वाचं आहे ते करण्याचा माझा प्रयत्न असतो.”, असंही तो पुढे म्हणाला.

इशान किशनने सध्याची कामगिरी कोणाला काही दाखवून देण्यासाठी नाही, असंही त्याने स्पष्ट केलं. “कोणाली काहीही दाखवून देण्याचा माझा हेतू नाही. मी फक्त खेळाचा आनंद घेत आहे.” काही गोष्टींवर नियंत्रण ठेवत असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं. “आपण भुतकाळातून बऱ्याच गोष्टी शिकतो. जर मी तसाच असतो तर पहिल्या दोन षटकातील चेंडू सोडले नसते. पण मला आता 20 षटकंही मोठी असतात याची जाणीव आहे. खेळपट्टीवर वेळ काढून पुढे जात राहणं महत्त्वाचं आहे .” टी20 वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी होणार आहे. त्यामुळे कोणत्या 15 खेळाडूंची यासाठी निवड होते हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.