IND vs NZ Toss : न्यूझीलंडने टॉस जिंकला, कर्णधार रोहित शर्माच्या मनासारखं झालं
Icc Champions Trophy 2025 India vs New Zealand Toss : टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना जिंकून ए ग्रुपमधन नंबर 1 होण्यासाठी चुरस आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात ए ग्रुपमधील न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने आहेत. हा या साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 2 वाजता टॉस झाला. न्यूझीलंडने टॉस जिंकला. कर्णधार मिचेल सँटनर याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तसेच मी पण टॉस जिंकून बॅटिंग करण्याचाच निर्णय घेतला असता, असं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने स्पष्ट केलं.
दोन्ही संघाकडून प्रत्येकी 1 बदल
टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1 बदल केला आहे.टीम इंडियात हर्षित राणा याच्या जागी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याला संधी देण्यात आली आहे. तर न्यूझीलंडने डेव्हॉन कॉनव्हे याच्या जागी डॅरेल मिचेल याचा समावेश केला आहे.
टीम इंडियाचा दुबईतील नववा सामना
टीम इंडियाचा हा दुबईतील या स्टेडियममधील नववा एकदिवसीय सामना आहे. टीम इंडिया दुबईतील या स्टेडियममध्ये अजिंक्य राहिली आहे. टीम इंडियाने 8 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
आयसीसी वनडे स्पर्धेतील आकडेवारी
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड दोन्ही संघ आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत आतापर्यंत 11 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी न्यूझीलंडने 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर टीम इंडियाने पलटवार करत किवींवर 5 वेळा मात केली आहे.
नंबर 1 होण्यासाठी लढत
दरम्यान दोन्ही संघांनी साखळी फेरीतील सलग 2 सामने जिंकत उपांत्य फेरी गाठलीय. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकून ए ग्रुपमधून नंबर 1 होण्यासाठी चढाओढ असणार आहे. तसेच या सामन्याच्या निकालानंतर उपांत्य फेरीत कोण कुणाविरुद्ध खेळणार? हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या सामन्याच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकला, टीम इंडियाची बॅटिंग
🚨 Toss 🚨 #TeamIndia have been to put into bat first against New Zealand
Updates ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#TeamIndia | #NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/uhSvImvgEQ
— BCCI (@BCCI) March 2, 2025
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : मिचेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओरुर्के.
